घरताज्या घडामोडीTaliban-अमेरिकेने 'ज्याची' कैदेतून केली सुटका त्यानेच केला अफगाणिस्तानचा गेम

Taliban-अमेरिकेने ‘ज्याची’ कैदेतून केली सुटका त्यानेच केला अफगाणिस्तानचा गेम

Subscribe

अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर एका व्यक्तीची जगभरात चर्चा सुरू आहे. ही व्यक्ती आहे मुल्ला अब्दुल गनी बरादर.

अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर एका व्यक्तीची जगभरात चर्चा सुरू आहे. ही व्यक्ती मुल्ला अब्दुल गनी बरादर असून अफगाणिस्तानचा भावी राष्ट्रपती म्हणून त्याच्याकडे पाहीले जात आहे. मुल्ला अब्दुल गनी बरादरला २०१० साली पाकिस्तानमधील कराची येथे अटक करण्यात आली होती. पण अमेरिका आणि तालिबान यांच्यातील करारानंतर माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बरादरला सोडण्याचे निर्देश दिले. त्यानंतर २०१८ साली बरादरची सुटका करण्यात आली.

तालिबानचा सह-संस्थापक आणि मुल्ला उमरच्या विश्वासू कमांडरमध्ये मुल्ला अब्दुल गनी बरादरचा समावेश होता. पण त्याला २०१० मध्ये कराचीत अटक करण्यात आली. पण नंतर अमेरिका -तालिबानच्या करारावर त्याला सोडण्यात आले.  या घटनेमुळे मुल्ला अब्दुल गनी बरादर चवताळला होता. तालिबानचा हिरो म्हणून त्याची ओळख होती. त्यानंतर पडद्यामागे राहून तो दहशतवादी संघटना हाताळत होता. नंतर बरादरवर कतारच्या दोहा शहरातलं तालिबान्यांचे राजकीय संबध सांभाळण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. रविवारी संध्याकाळी तो कतारहून अफगाणिस्तानात आला होता. अफगाणिस्तानवर तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर बरादरने ईश्वराच्या कृपेमुळे आमचा कमी वेळात विजय झाल्याचे जाहीर केले. पण आता खऱ्या अर्थाने आमची परिक्षा सुरू झाली असून लोकांच्या विश्वासाला पात्र ठरण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे त्याने जाहीर केले आहे.

- Advertisement -

अफगाणिस्तानवर तालीबानला कब्जा मिळवण्यात बरादरची मोठी भूमिका आहे. तो कट्टरपंथीय असून १९८० साली सोव्हियत संघाविरोधातही त्याने अफगाण मुजाहिदीन म्हणून हल्ले केले होते. मुल्ला उमर हा बरादरच्या बहिणीचा पती आहे. त्याच्याच मदतीने त्याने कंदाहार येथे एक मदरसाही सुरू केला. तेथे शिकायला येणाऱ्या लहान मुलांना तो धर्माचे शिक्षण द्यायचा. इस्लाम संकटात असून परकिय देशांपासून धर्माचे कसे संरक्षण करावे. तसेच शरियत कायद्याचा धर्मात कसा अवलंब करावा. महिला बालकांचे कसे रक्षण करावे याचे शिक्षण तो तरुण तालिबान्यांना देऊ लागला. सुरुवातील धर्माच्या संरक्षणासाठी तालिबान व्हावे लागत असल्याने मोठ्या संख्येने आखाती देशातील तरुण या तालिबानी संघटनेत सामील होऊ लागले. सुरुवातीला तालिबानी नागरिकांसाठी काम करत होते. पण नंतर या संघटनेशी पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा असलेल्या आयएसआयने हातमिळवणी केली. त्यानंतर तालिबान दहशतवादात बदलले. १९९६ पर्यंत तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला व इस्लामीक अमीरातची स्थापना केली.

 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -