घरताज्या घडामोडीकाबुल विमानतळावर अफगाणि मातांचा आक्रोश, तारेच्या कुंपणावरून मुलांची फेकाफेक, अनेक बालके जखमी

काबुल विमानतळावर अफगाणि मातांचा आक्रोश, तारेच्या कुंपणावरून मुलांची फेकाफेक, अनेक बालके जखमी

Subscribe

मुलांचे जीव वाचवण्यासाठी अफगाणी महिला मोठ्या संख्येने मुलांना घेऊन काबुल विमानतळावर धडकल्या आहेत.

अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर देशभरात तालिबानने दहशत निर्माण केली असून देश सोडून पलायन करणाऱ्या महिला व मुलांना तालिबान्यांकडून मारहाण केली जात आहे. तर पुरुषांना गोळ्या घालून ठार करण्यात येत आहे. यामुळे मुलांचे जीव वाचवण्यासाठी अफगाणी महिला मोठ्या संख्येने मुलांना घेऊन काबुल विमानतळावर धडकल्या आहेत. आमच्या मुलांना तरी वाचवा अशा विनवण्या करत विमानतळावरील तारेच्या कुंपणावरून मुलांना अक्षरश पलिकडे तैनात ब्रिटीश पॅराटुपर्सच्या दिशेने फेकत आहेत. या धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून या फेकाफेकीत अनेक बालके जखमी झाली आहेत.

- Advertisement -

अफगाणि नागरिकांचे हक्क अबाधित ठेवण्याबरोबरच महिलांना सन्मान देण्याचा दावा करणाऱ्या तालिबानींचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आला आहे. तालिबानी घराघरात घुसून महिला आणि मुलांवर अत्याचार करत आहेत. तर काही ठिकाणी सेक्सगुलाम बनवण्यासाठी मुलींना व महिलांना घरातून उचलून नेत आहेत. यामुळे अफगाणिस्तानमध्ये अफरातफरीचे वातावरण निर्माण झाले आहे. अफगाणि पुरूष घरातील महिला व मुलांना घेऊन काबुल विमानतळावर येत आहेत. पण तालिबान्यांनी विमानसेवाच बंद केल्याने अनेकजण तिथे अडकून पडले आहेत. तालिबान्यांच्या तावडीतून जिवंत सुटका होणे कठीण असल्याने अफगाणि महिला मुलांच्या जीवाची भीक मागत आहेत. तर काही महिला विमानतळावरील तारेच्या कुंपणापलिकडे असलेल्या ब्रिटीश पॅरापैराट्रूपर्सच्या दिशेने मुलांना फेकत त्यांना वाचवा अशी याचना करत आहेत. काबुल विमानतळाजवळ बॅरेन नावाचे हॉटेल आहे. या हॉटेलबाहेर अफगाणि नागरिकांनी गर्दी केली आहे. प्रवेशद्वाराच्या गेटवरूनही महिला आणि पुरुष मुलांना पलिकडे असलेल्या नागरिकांकडे फेकत आहेत. आमच्या मुलांना वाचवा असा आक्रोश या माता करत आहेत.

- Advertisement -

अफगाणिस्तानवर तालिबानने कब्जा केल्यानंतर अनेक देशांनी अफगाणिस्तानात अडकलेल्या आपल्या नागरिकांना मायदेशी आणण्यास सुरूवात केली. तसेच अमेरिकेनेही अनेक अफगाणि रेफ्यूजींना एअरलिफ्ट केले असून कतार, उझबेकिस्तानमध्ये सोडले आहे. ब्रिटीश एअरलिफ्टने अफगाणिस्तानातून ७०० उड्डाणे केली असून १२०० नागरिकांची तालिबान्यांच्या तावडीतून सुखरूप सुटका केली आहे. यात ३०० नागरिक ब्रिटनचे असून ९०० जण अफगाणि आहेत. ज्यांना एआरएपी अंतर्गत आश्रय देण्यात आला आहे.

Kavita Joshi - Lakhehttps://www.mymahanagar.com/author/lkavita/
गेली १३ वर्ष पत्रकारितेत. सामाजिक विषयांवर लिखाण. ब्लॉग्जवरही लेखन. प्रिंट, डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -