घरक्रीडाT20 World Cup : वॉर्नर, स्मिथचे कमबॅक; टी-२० वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाचा मजबूत संघ

T20 World Cup : वॉर्नर, स्मिथचे कमबॅक; टी-२० वर्ल्डकपसाठी ऑस्ट्रेलियाचा मजबूत संघ

Subscribe

यंदाचा टी-२० वर्ल्डकप १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत पार पडणार आहे.

आगामी टी-२० वर्ल्डकपसाठी (T20 World Cup) ऑस्ट्रेलियाचा १५ सदस्यीय संघ गुरुवारी जाहीर करण्यात आला. डेविड वॉर्नर, स्टिव्ह स्मिथ आणि पॅट कमिन्स या प्रमुख खेळाडूंचे ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन झाले आहे. यंदाचा टी-२० वर्ल्डकप १७ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर या कालावधीत ओमान व युएईमध्ये पार पडणार आहे. येथील खेळपट्ट्या फिरकीला अनुकूल असण्याची शक्यता असून अ‍ॅडम झॅम्पा आणि मिचेल स्वॅपसन या लेगस्पिनर्ससह डावखुरा फिरकीपटू अ‍ॅश्टन एगरचा ऑस्ट्रेलियन संघात समावेश करण्यात आला आहे. तसेच अ‍ॅलेक्स कॅरीला डच्चू देण्यात आला असून जॉश इंग्लिस या नवख्या यष्टिरक्षकाची ऑस्ट्रेलियन संघात निवड करण्यात आली आहे.

स्टोइनिस, मॅक्सवेलही संघात 

कोपराच्या दुखापतीमुळे ३२ वर्षीय स्मिथला वेस्ट इंडिज आणि बांगलादेश दौऱ्याला मुकावे लागले होते. वॉर्नर आणि कमिन्स यांनीही या दौऱ्यातून माघार घेतली होती. परंतु, अपेक्षेनुसार, टी-२० वर्ल्डकपसाठी त्यांचे ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन झाले आहे. तसेच मार्कस स्टोइनिस आणि ग्लेन मॅक्सवेल या अष्टपैलू खेळाडूंचाही संघात समावेश करण्यात आला आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे कर्णधार अ‍ॅरॉन फिंचवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. परंतु, टी-२० वर्ल्डकपपूर्वी तो पूर्णपणे फिट होणे अपेक्षित आहे.

- Advertisement -

पहिल्यांदा टी-२० वर्ल्डकप जिंकण्यास उत्सुक 

ऑस्ट्रेलिया हा जागतिक क्रिकेटमधील सर्वात बलाढ्य संघांपैकी एक मानला जातो. ऑस्ट्रेलियाने विक्रमी पाच वेळा एकदिवसीय वर्ल्डकप जिंकला आहे. परंतु, टी-२० वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलियाची जेतेपदाची पाटी कोरी आहे. टी-२० क्रिकेटमध्ये मागील काही काळात ऑस्ट्रेलियाला चांगली कामगिरी करता आलेली नाही. त्यांनी विंडीज आणि बांगलादेशविरुद्धच्या मालिका मोठ्या फरकाने गमावल्या. परंतु, कामगिरीत सुधारणा करून यंदा पहिल्यांदा टी-२० वर्ल्डकप जिंकण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघ उत्सुक आहे.

- Advertisement -

हेही वाचा – T20 World Cup : टीम इंडिया जेतेपदासाठी दावेदार, ‘हा’ खेळाडू ठरू शकेल मॅचविनर


 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -