घरदेश-विदेशIndiGo ने 'या' देशांतील आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण केले रद्द, जाणून घ्या कारण

IndiGo ने ‘या’ देशांतील आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण केले रद्द, जाणून घ्या कारण

Subscribe

भारतातील सर्वात मोठी एअरलाईन कंपनी IndiGo ने अरब देशांमध्ये जाणारे सर्व आंतरराष्ट्रीय विमान उड्डाण एक आठवड्यांसाठी रद्द केले आहे. इंडस्ट्री इनसाइडर्स कंपनीने इंडियो गोवर आरोप केले की, या विमान कंपनीने काही प्रवाशांना घेऊन जात युएई देशाच्या प्रवासासंबंधीत नियमांचे उल्लंघन केले आहे. इंडिगोकडून जाहीर केलेल्या माहितीनुसार, ऑपरेशनल इश्यूमुळे अरब अमिरात जाणारी सर्व आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे रद्द करण्यात आली आहे. यामुळे IndiGo ची सर्व विमान उड्डाणे २४ ऑगस्ट २०२१ पर्यंत बंद असतील.

इंडिगोने सर्व प्रवाशांना सुचना दिल्या की, सर्व प्रवाशांना विमान तिकिटांचे पैसे रिफंड देऊ किंवा आमचे विमान उड्डाण पुन्हा सुरु होताच दुसऱ्यांदा विमान प्रवास करताना ते वापरु शकतात.  भारत सरकारच्या सध्याच्या मार्गदर्शक तत्वांनुसार, देशांतर्गत विमान उड्डाणांसाठी वेब-चेक-इन आवश्यक आहे, यात देशांतर्गत विमान उड्डाणापूर्वी ४८ तास आधी ते एक तासापर्यंत आपण फीशिवाय वेब चेक इन करु शकता. तर आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणासाठी ७५ मिनिटांपासून ते २४ तासांपर्यंत वेब-चेक-इन करु शकतात. या देशांतर्गत विमान उड्डाणांसाठी एअरपोर्टवर चेन इन करता तेव्हा तुम्हाला २०० रुपयांचे शुल्क भरावे लागेल.

- Advertisement -

देशांतर्गत प्रवासासाठीचे कंपनीचे नियम वेबसाईटवर

देशातील कोरोनाची स्थिती पाहता विविध राज्यांकडून लागू होणारे विमान प्रवासासाठीचे नियम विमान कंपन्या आपल्या वेबसाइटवर अपडेट करत आहेत. त्यामुळे तुम्हीही कोणत्याही राज्यात प्रवास करताना त्या राज्यातील किंवा शहारांतील प्रवासाशी संबंधित नियम जाणून घेणे गरजेचे आहे.


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -