घरताज्या घडामोडीमाथेरानची राणी ‘मिनीट्रेन’ला युनेस्कोचा हेरिटेज दर्जा

माथेरानची राणी ‘मिनीट्रेन’ला युनेस्कोचा हेरिटेज दर्जा

Subscribe

माथेरानकरांसाठी शिवाय पर्यटकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

माथेरानमधील पर्यटकांचे खास आकर्षण असणारी महाराष्ट्रातील एकमेव नॅरोगेज माथेरानची राणी पुन्हा एकदा युनेस्कोच्या हेरिटेजसाठी सज्ज झाली आहे. याबाबत नुकतेच रेल्वेचे अधिकारी यांनी माथेरानला भेट दिली आहे. यात काही माथेरानचा सांस्कृतिक वारसा जपणारी माहिती मध्य रेल्वेला हवी असल्याने माथेरान नगरपालिकेत अर्ज दाखल केला आहे. युनेस्को ग्रेस मिलीना मार्कोरी या पुरस्कारासाठी माथेरानच्या मिनीट्रेनच नामांकन पाठवल जात आहे. माथेरानच्या राणीचा बोलबाला आता आतंराष्ट्रीय पातळीवर ऐकू येणार आहे. २००२ मध्ये देखील यासाठी केलेले प्रयत्न तांत्रिक कारणामुळे अशक्य झाले. मात्र आता पुन्हा मध्य रेल्वेने युनेस्कोकडे अर्ज दाखल केला आहे.

युनेस्कोकडून या अर्जाचा स्वीकार करण्यात आला असून, याबाबत उपमुख्य पर्यावरण एवं गृहव्यवस्था प्रतिबंधक शिवाजी कदम यांनी माथेरान नगरपालिकेस पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये माथेरानमधील सांस्कृतिक वारसा जपणारी माहिती रेल्वेच्या संकेतस्थळावर मागविण्यात आली आहे. यावेळी सिनियर सेक्शन इंजिनियर सुशिल सोनावणे तसेच रेल्वे कामगार सेनाचे सचिव दगडू आव्हाड यांनी अर्ज दाखल केला आहे. मात्र युनेस्कोने माथेरान मिनीट्रेनला हेरिटेज दर्जा दिला तर भारतीय रेल्वे याना मोठी रक्कम असलेल बक्षीस मिळेल. तर हा हेरिटेज दर्जा माथेरानकरांसाठी शिवाय पर्यटकांसाठी अभिमानाची गोष्ट आहे.

- Advertisement -

माथेरान नेरॉगेज रेल्वे मार्गावर १९०७ सालापासून रेल्वे सेवा सुरू करण्यात आली. नेरळ ते माथेरान दरम्यानचे २१ किलोमीटरचे अंतर हे निसर्गरम्य डोंगरातून जात असल्याने पर्यटकांसाठी एक पर्वणी ठरते. १९०१ मध्ये येथील उद्योगपती सर आदमजी पिरभाय यांनी स्वतःचे १६ लाख रुपये खर्चून ही रेल्वे बनविण्याचा निर्णय घेतला. मुलगा अब्दुल हुसेन आदमजी पिरभाय यांनी १९०७ मध्ये या रेल्वेचे काम पूर्ण केले. स्वातंत्र्यानंतर ही मिनीट्रेन भारत सरकारच्या अखत्यारित आली. त्यावेळी वाफेच्या इंजिनवर ही मिनीट्रेन धावत होती. १९८३ मध्ये वाफेचे इंजिन बंद करून डिझेलवर धावणारी इंजिन वापरली जाऊ लागली.

- Advertisement -

युनेस्कोने महाराष्ट्रात ‘ही’ वारसास्थळे जाहीर केली

united nations educational,scietific & cultural organization म्हणजेच युनेस्कोने जागतिक स्थानांपैकी भारतामध्ये ३६ वेगवेगळी स्थळे आहेत. त्यामुळे वारसा स्थळांच्या जगातील क्रमवारीत भारताचा सहावा क्रमांक आहे. अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (व्हिक्टोरिया),व्हिक्टोरियन गोथिक बिल्डिंग समूह, मुंबई,घारापुरी लेणी आणि कास पठार या स्थळांना युनेस्कोचा हेरिटेज दर्जा प्राप्त झाला आहे.


हेही वाचा – समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, १२ जणांचा मृत्यू तर ३ जखमी


 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -