घरक्रीडाIND vs ENG : कोहली सर्वाधिक शिवीगाळ करणारा खेळाडू; इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूची...

IND vs ENG : कोहली सर्वाधिक शिवीगाळ करणारा खेळाडू; इंग्लंडच्या माजी क्रिकेटपटूची टीका

Subscribe

कोहलीने जे शब्द वापरले त्याने मला धक्का बसला होता.

भारताचा कर्णधार विराट कोहलीतील आक्रमकता आणि जोश यामुळे त्याचे असंख्य चाहते आहे. परंतु, काहींना त्याची हीच गोष्ट फारशी आवडत नाही. कोहलीचा आक्रमकपणा इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातही दिसून आला. लॉर्ड्सवर झालेल्या या सामन्यात भारत आणि इंग्लंडच्या खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक झाल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज मार्क वूडने भारताच्या जसप्रीत बुमराहच्या हेल्मेटला लक्ष्य करत सतत बाऊंसर टाकले. त्यानंतर बुमराहची इंग्लंडचा कर्णधार जो रूट आणि जिमी अँडरसन यांच्याशी शाब्दिक चकमक झाली. तसेच जॉस बटलर आणि ऑली रॉबिन्सन या इंग्लिश खेळाडूंनीही भारतीय खेळाडूंना स्लेज केले. कोहलीने इंग्लंडच्या खेळाडूंनी केलेल्या स्लेजिंगचे प्रत्युत्तर दिले. परंतु, ही गोष्ट इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू निक कॉम्प्टनला आवडली नाही.

टीका करणारे ट्विट केले डिलीट 

कोहली सर्वाधिक शिवीगाळ करणारा खेळाडू आहे, असे तुम्हालाही वाटत नाही का? २०१२ मध्ये त्याने मला केलेली शिवीगाळ मी कधीही विसरू शकणार नाही. त्याने जे शब्द वापरले त्याने मला धक्का बसला होता. त्यामुळे त्याचेच नुकसान होत असल्याचे मला वाटले होते. त्याच्या अशा वागणुकीमुळे रूट, तेंडुलकर, विल्यमसन यांसारखे खेळाडू किती संयमी आहेत, हे कळते, असे कॉम्प्टनने त्याच्या ट्विटमध्ये म्हटले होते. परंतु, काही काळाने त्याने हे ट्विट डिलीट केले.

- Advertisement -
nick compton tweet
निक कॉम्प्टनने ट्विट करत कोहलीवर टीका केली, पण नंतर त्याने हे ट्विट डिलीट केले

इंग्लंडच्या खेळाडूंनी डिवचल्याचा फायदा

दरम्यान, इंग्लंडच्या खेळाडूंनी डिवचल्याचा चौथ्या डावात आम्हाला फायदा झाल्याचे लॉर्ड्स कसोटीनंतर कोहली म्हणाला होता. दुसऱ्या कसोटीत भारताने इंग्लंडपुढे २७२ धावांचे आव्हान ठेवले होते, ज्याचा पाठलाग करताना इंग्लंडचा डाव १२० धावांत आटोपला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या या कसोटी मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आता या मालिकेतील तिसरा सामना बुधवार, २५ ऑगस्टपासून लीड्स येथे खेळला जाईल.


हेही वाचा – ‘कोहली कोणतीही गोष्ट विसरत नाही, त्याच्या सहकाऱ्यांना डिवचल्यास तो प्रत्युत्तर देतोच’!

- Advertisement -

 

Anvay Sawant
Anvay Sawanthttps://www.mymahanagar.com/author/sanvay/
गेल्या तीन वर्षांपासून प्रसारमाध्यम क्षेत्रात सक्रिय. वृत्तपत्र आणि आता डिजिटल मीडिया असा दोन्ही क्षेत्रांचा अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय क्रीडा विषयात लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -