घरलाईफस्टाईलNutrition Week 2021: शरीरात 'ही' लक्षणे दिसली तर वेळीत व्हा सावध!

Nutrition Week 2021: शरीरात ‘ही’ लक्षणे दिसली तर वेळीत व्हा सावध!

Subscribe

तुमचे आरोग्य उत्तम नसेल तर आयुष्यात कितीही मोठा आनंद मिळवला तर काय उपयोग. निरोगी जीवनशैली असण्याचं कारण म्हणजे आपल्या खाण्या-पिण्याची सवय. आपल्या शरीराला कार्य करण्यासाठी आणि शरीरात ऊर्जा निर्माण करण्यासाठी शरीरास पोषण मिळणे आवश्यक आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपली जीवनशैली इतकी व्यस्त झाली आहे की, आपण काय-खातो पितो हे लक्षात ठेवणं देखील मुश्कील झाले आहे. शरीरास योग्य पोषण न मिळाल्याने अनेक समस्या सुरू होतात. याविषयी लोकांना जागरूक करण्यासाठी दरवर्षी सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पोषण दिन साजरा केला जातो. मात्र तुम्हाला तुमच्यात ही लक्षणं दिसत असतील तर वेळीच सावध व्हा, कारण ही काही लक्षणं तुमच्या शरीरात पोषण नसल्याचे चिन्ह दर्शवतात.

केस गळणं

शरीरातील लोहाची कमतरता केस गळण्यामागील कारण असू शकते. महिलांमध्ये सर्वाधिक केस गळण्याची समस्या असते. अशक्तपणा आणि चक्कर येणे देखील लोहाच्या कमतरतेची लक्षणं आहेत. त्यामुळे तुम्हाला यापैकी कोणतीही लक्षणे दिसली तर डॉक्टरांचे त्वरीत मार्गदर्शन घ्या.

- Advertisement -

अचानक वजन कमी होणं

अचानक वजन कमी होणे हे शरीरास पोषक घटक कमतरतेचे प्रमुख लक्षण आहे. शरीर त्याच्या नियमित कार्यासाठी पोषक घटकांवर अवलंबून असते. मात्र जेव्हा त्यांची कमतरता भासते, तेव्हा शरीर उर्जेसाठी आधीच साठवलेल्या चरबीवर अवलंबून राहते आणि वजन कमी होऊ लागते.

रात्री कमी दिसणं

जर तुम्हाला रात्री कमी दिसू लागले असेल तर तुमच्या व्हिटॅमिन-एची कमतरता असल्याचे लक्षण आहे. शरीरातील व्हिटॅमिन ए हे डोळ्याच्या आरोग्याशी संबंधित आहे. याची कमतरता शऱीरात असेल तर कोरडे डोळे होणे, घसा आणि छातीत संसर्ग होणे अशा आजारांचा समावेश आहे.

- Advertisement -

हाडांमध्ये वेदना

हाडांचे आरोग्य हे प्रामुख्याने शरीरात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमच्या मात्रावर अवलंबून असते. जर तुमची हाडे दुखत असतील, तर तुमच्यात कोणत्याही पोषक घटकांची कमतरता असल्याचे लक्षण असू शकते. हाड दुखणे देखील लोहाची कमतरता आणि अशक्तपणाशी संबंधित असते. त्यामुळे तुमची हाडं दुखत असतील तर वेळीच सावध होऊन डॉक्टरांचा सल्ला वेळीच घ्या.

हृदयाचे ठोके अनियमित होणे

अनियमित हृदयाचे ठोके सहसा हृदयाच्या समस्यांशी असतात, याचे कारण शरीरात कॅल्शियमची कमतरता असू शकते. ही लक्षणे ओमेगा -3 फॅटी अॅसिड आणि आवश्यक जीवनसत्त्वे कमी असण्याचे लक्षण देखील असू शकतात. अशा परिस्थितीत, आपण निश्चितपणे तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.


 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -