बॉलिवूड अभिनेता आणि बिग बॉस विजेता सिद्धार्थ शुल्का याचे ह्रदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सिद्धार्थने जगातून अचानक घेतलेल्या एक्झिटमुळे शोक व्यक्त केला जात आहे. हिंदी टेलिव्हिजनसह बॉलिवूडमधूनही हळहळ व्यक्त होते. सिद्धार्थच्या अचानक जाण्याने चाहत्यांनाही मोठा धक्का बसलाय. बॉलिवूड अभिनेता सलमान खान याने देखील सिद्धार्थ शुक्लाच्या निधनावर दु:ख व्यक्त केलेय. सलमान खानने सिद्धार्थ शुक्लाला श्रद्धांजली वाहत एक ट्वीट केल आहे. सलमान खानने ट्वीट करत म्हटले की, “Sidharth Shukla खूप लवकरं सोडून गेलास, तू नेहमी आठवणीत राहशील. कुटुंबाप्रति संवेदना RIP’.”
Gone too soon Siddharth.. u shall be missed. Condolences to the family .. RIP🙏
— Salman Khan (@BeingSalmanKhan) September 2, 2021
बिग बॉसच्या मंचावरील सलमान आणि सिद्धार्थचे काही व्हिडीओ नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्या दोघांमधील बाँडिंग देखील चाहत्यांनीही पाहिले आहे. सिद्धार्थ अशाप्रकारे यशाच्या शिखरावर असताना त्याची अकाली एक्झिट अनेकांसाठी चटका लावणारी आहे.
sidharth shukla:आयुष्य भरपूर आहे पुन्हा भेटूया… सिद्धार्थचा जुना व्हिडिओ व्हायरल
सिद्धार्थ शुक्लाने २००२ पासून आपल्या करियरची सुरुवात केली. मालिका विश्वातून प्रकाश झोतात येत त्याने प्रेक्षकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण केले. याचदरम्यान त्याने बिग बॉस १३ मध्ये धमाकेदार एंट्री घेत तो चर्चेचा नवा चेहरा ठरला. बिग बॉस शोमधील सिद्धार्थ शुक्ला जबरदस्त परफॉर्मन्सने होस्ट सलमान खानला देखील प्रभावित केले. एका एपिसोड दरम्यान सलमान खान याने सर्व स्पर्धकांसमोर सांगितले की, सिद्धार्थ शुक्लाला सर्वाधिक वोट मिळतायत. त्यामुळे सिद्धार्थचं या शोचा वीनर ठरु शकतो.
Sidharth Shukla death: सिद्धार्थ शुक्लाच्या अचानक एक्झिटमुळे बॉलिवूड कलाकारांना अश्रू अनावर, सना खानच्या भावनांचा फुटला बांध
याच बिग बॉस शोदरम्यान सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांची जोडी विशेष चर्चेत होती. या दोघांमधील केमिस्ट्री प्रेक्षकांनाही अधिक आवडली. सिद्धार्थने बिग बॉसची ट्रॉफी जिंकल्यानंतर सोशल मीडियावर सिद्धार्थ- शहनाज ही जोडी ट्रेंडिगला होती. लवकरचं दोघ एकत्र एका शोमध्ये काम करणार आहेत. मात्र त्याला अकाली मृत्यूमुळे शहनाज गिलला हे दु:ख पचवणे अधिकचं अवघड जातेय. वयाच्या अवघ्या चाळीसाव्या वर्षी सिद्धार्थने जगाचा निरोप घेतला. ह्रदयविकाराच्या झटक्यामुळे त्याचे निधन झाले. सिद्धार्थ शुक्लाच्या मृतदेहाच्या पोस्टमॉर्टमची प्रक्रिया मुंबईच्या कूपर रुग्णालयात सुरू आहे. मुंबई पोलिसांनी हे स्पष्ट केलं आहे की सिद्धार्थच्या मृतदेहाचे शव विच्छेदन होईल.
Sidharth Shuklaने तीन दिवसांपूर्वीच केली होती इन्स्टाग्राम-टि्वटरवर शेवटची पोस्ट