sidharth shukla:आयुष्य भरपूर आहे पुन्हा भेटूया… सिद्धार्थचा जुना व्हिडिओ व्हायरल

सिद्धार्थच्या चाहत्यांना तर या घटनेवर विश्वास ठेवणेही अवघड होतेय. या बातमीने लाखो चाहत्यांना अश्रु अनावर झाले आहेत.

छोट्या पडद्यापासून ते अगदी बॉलिवूड(bollywood) विश्वापर्यंतचा लोकप्रिय असलेला अभिनेता सिद्धार्थ शुक्ला  (sidharth shukla death) याचे ह्रदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. तो अवघ्या ४० वर्षांचा होता. सिद्धार्थच्या अचानक झालेल्या एक्झिटमुळे बॉलिवूड कलाकारांसह अनेक राजकीय व्यक्तींनी देखील हळहळ व्यक्त केली आहे. मुंबईतील कपूर रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. सिद्धार्थच्या निधनाच्या बातमीमुळे चाहत्यांना तसंच अनेक सेलिब्रिटींना धक्का बसला आहे. सिद्धार्थच्या चाहत्यांना तर या घटनेवर विश्वास ठेवणेही अवघड होतेय. या बातमीने लाखो चाहत्यांना अश्रू अनावर झाले आहेत. दरम्यान चाहत्यांनी सोशल मीडियावर सिद्धार्थचे अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर केले आहेत. सध्या ट्विटरवर सिद्धार्थचा एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. आणि हा व्हिडिओ पाहून लोकांच्या अश्रूंचा बांध फुटला आहे.(viral video:sidharth shukla said fir milenge dobara)

ट्विटरवर @YoutuberMrBug या यूजरने सिद्धार्थ सोबतचा एक जुना व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये सिद्धार्थ त्याच्या चाहत्याशी बोलत आहे की, “मी तुला भेटू शकलो नाही याची मला खंत आहे. मला तुझ्या बहिणीबद्दल माहिती मिळाली. मला आशा आहे की तो ठीक आहे. ती लवकरच बरी होईल. या दरम्यान, सिद्धार्थ म्हणतो – आयुष्य भरपूर आहे पुन्हा भेटूया”

व्हिडिओ पाहा- 

व्हायरल होणारा व्हिडिओ कधी शूट करण्यात आला आहे याची माहिती अद्याप कळू शकली नाहीये. सिद्धार्थ २०१६मध्ये ‘खतरो के खिलाडी ७’चा विजेता झाला. त्यानंतर २०१९मध्ये बिग बॉस सीझन १३ मध्ये सिद्धार्थ दिसला होता. बिग बॉसच्या घरात शहनाज गिल आणि सिद्धार्थ शुक्ला यांची क्रेमिस्ट्री चाहत्यांना चांगलीच भावली होती. पहिल्यांदा बिग बॉसमध्ये दोघांची भेट होऊनही दोघांचे नाते इतके घट्ट झाले होते की त्यांच्यामध्ये होणाऱ्या वाद-विवाद, प्रेम,रुसणं -फुगणं याची चर्चा बिग बॉसच्या घराबाहे व्हायरल होत असे. सिद्धार्थच्या निधनाची बातमी कळताच शहनाजला सुद्धा मानसिका धक्का बसला आहे.


हे हि वाचा – sidharth shukla-सिद्धार्थची आईबरोबर होती स्पेशल बॉंडींग