घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रशिक्षक पुरस्कारांचा मुहुर्त हुकला

शिक्षक पुरस्कारांचा मुहुर्त हुकला

Subscribe

जिल्हा परिषद अर्थसंकल्पात आर्थिक तरतूदच नाही; वर्षभर प्रतीक्षा

 शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या जिल्हा परिषद गुणवंत शिक्षक पुरस्कारांचे वितरण लांबणीवर पडले आहे. पुरस्कार वितरण सोहळा घेण्यासाठी आवश्यक सव्वादोन लाखांची तरतूदच अर्थसंकल्पातून रद्द केल्यामुळे या पुरस्कारांच्या वितरणासाठी किमान वर्षभर वाट बघावी लागणार आहे.पुरस्कार घोषीत झाले असले तरी, त्यांचे वितरण होणार नसल्याने शिक्षकदिनी शिक्षकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी जिल्हा परिषदेच्या आदर्श शिक्षक पुरस्कार स्थगित केले होते. त्यामुळे यंदा तरी, पुरस्काराला मुहुर्त लागणार की नाही याबाबत शंका उपस्थित केली जात होती. मात्र, शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर यांनी आदर्श शिक्षक पुरस्काराची घोषणा केली आहे. पुरस्कारासाठी जिल्हाभरातून ४५ प्रस्ताव प्राप्त होणे अपेक्षित असताना केवळ २३ प्रस्तावच प्राप्त झाले होते. त्यातून १५ आदर्श शिक्षकांची नावे जाहीर झाली आहे.प्रशासनाने शिक्षक पुरस्काराला यंदा खंड पडू दिलेला नसला तरी, प्रत्यक्षात पुरस्कार वितरण मात्र होणार नाही.

- Advertisement -

जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्प सादर करतांना शिक्षण विभागाने आदर्श शिक्षक पुरस्कार वितरणासाठी सव्वादोन लाख रूपयांची तरतूद करण्यात आली होती. परंतू, सभेत दरम्यान, सेस वाढविण्यासाठी सदस्यांनी यंदा कोरोना असल्याचे सांगत शिक्षक पुरस्कार सोहळा होणार नाही त्यासाठी तरतूद कशाला करतात असा प्रश्न करत निधीची तरतूद रद्द केली होती. या हेडला केवळ ५० हजार रूपयांची तरतूद केली आहे.निधीची तरतूद नसल्याकारणाने पुरस्कार वितरणाचा कार्यक्रम घेणे शक्य नसल्याचे सांगण्यात येत आहे.

त्यामुळे शिक्षणकांना प्रत्यक्षात पुरस्कार स्वीकारण्यासाठी वर्षभर प्रतीक्षा करावी लागेल.गुणवंत शिक्षक पुरस्कार शशिकांत काशिनाथ शिंदे (ता. बागलाण), मंजुषा बबन लोखंडे (ता. चांदवड), स्वाती केशव शेवाळे (ता. देवळा),नितीन कौतिक देवरे (ता. दिंडोरी),कैलास यादव शिंदे (ता. इगतपुरी), देविदास भिला मोरे (ता. कळवण),सर्जेराव रावजी देसले (ता.मालेगांव),संदीप कडू हिरे (ता. निफाड),जयंत रामचंद्र जाधव (ता. नाशिक),निलेश नारायणराव शितोळे (ता. नांदगांव), प्रमोद वसंत अहिरे (ता. पेठ),विजय तुकाराम निरगुडे (ता. सिन्नर),हरेराम मोहन गायकवाड (ता. सुरगाणा),रवींद्र गंगाराम लहारे (ता. त्र्यंबकेश्वर),संदिप जगन्नाथ वारुळे (ता.येवला).

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -