घरक्रीडातर AUS VS AFG पहिली कसोटी रद्द करू, क्रिकेट ऑस्ट्रेलियाची तालिबांन्यांना तंबी

तर AUS VS AFG पहिली कसोटी रद्द करू, क्रिकेट ऑस्ट्रेलियाची तालिबांन्यांना तंबी

Subscribe

ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने अफगाणिस्तान विरोधात कसोटी सामना खेळण्याबाबत एक मोठे विधान केले आहे. जर तालिबानने अफगाणिस्तानच्या महिलांना विविध खेळांमध्ये सहभागी होण्यास मज्जाव केला तर आम्ही कसोटी सामना रद्द करू असे ऑस्ट्रेलियन क्रिकेट बोर्डाने स्पष्ट केले आहे. एका ऑस्ट्रेलियन वाहिनीने तालिबानच्या प्रवक्त्याचे खेळांबाबतचे मत प्रसिद्ध केले आहे. त्यामध्ये तालिबान्यांकडून महिलांना क्रिकेट खेळण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. तालिबानी राज्यकर्त्यांकडून स्पष्ट केल्यानुसार महिलांनी क्रिकेट खेळणे गरजेचे नसून क्रिकेट खेळणे हे इस्लाम धर्मविरोधी असल्याचे स्पष्ट केले आहे. क्रिकेट खेळताना चेहरा आणि शरीर झाकले जात नसल्यानेच तालिबान्यांनी महिलांच्या क्रिकेटला विरोध केला आहे. ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तानात येत्या नोव्हेंबर महिन्यात पहिलाच कसोटी सामना खेळला जाणार होता. (ACB to cancel first test against afganistan if taliban rulers stop women cricket in afganistan)

महिलांच्या क्रिकेटचा विकास होणे अतिशय महत्वाचे आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट हे महिलांच्या क्रिकेटसाठी नेहमीच प्रोत्साहन देत आले आहे. सर्वांसाठी क्रीडा प्रकार खुले असायला हवेत. महिलांना प्रत्येक पातळीवर क्रीडा प्रकार उपलब्ध व्हायला हवेत. क्रिकेट खेळण्यासाठीही सर्व महिलांना संधी मिळायला हवी असे आमचे मत असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने म्हटले आहे.

- Advertisement -

काही प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अफगाणिस्तानात महिला क्रिकेटवर बंदी आणण्यात आली आहे. त्यामुळेच क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडे आगामी होबार्ट येथील कसोटी सामना रद्द करण्याशिवाय पर्याय नाही असे त्यांनी स्पष्ट केले आहे. ऑस्ट्रेलियात अफगाणिस्तानसोबत पहिला सामना हा येत्या २७ नोव्हेंबरला आयोजित करण्यात आला आहे. या सामन्यासाठीचे नियोजन सुरू झाले होते असेही त्यांनी म्हटले आहे. तालिबानने घेतलेली भूमिका अतिशय चिंताजनक असल्याचेही तालिबानने म्हटले आहे. महिलांना कोणत्याही क्रीडा प्रकारापासून वंचित ठेवणे हे स्विकारले जाऊ शकत नाही. त्यामुळेच इंटरनॅशनल क्रिकेट काऊंसिल (ICC) ने याबाबतची भूमिका घ्यावी असेही एसीबीचे म्हणणे आहे. आंतरराष्ट्रीय संस्थांनीही अशा प्रकारच्या सरकारी निर्णयाविरोधात भूमिका घ्यायला हवी असेही एसीबीने स्पष्ट केले आहे.

तर दुसरीकडे आयसीसीनेही तालिबानमध्ये महिलांच्या क्रिकेटच्या बंदीबाबतचे वृत्त वाचल्याचे स्पष्ट केले आहे. येत्या बैठकीत आयसीसी याबाबतचा निर्णय घेईल असेही आयसीसीच्या प्रवक्त्याने स्पष्ट केले आहे. सांस्कृतिक आणि धार्मिक आव्हानामुळे अफगाणिस्तानातील परिस्थिती अतिशय आव्हानात्मक आहे. याआधीच अफगाणिस्तानला आयसीसीने २०१७ पुर्ण सदस्यत्व बहाल केले आहे, असेही आयसीसीच्या प्रवक्त्याने एका पत्रकाच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पाकिस्तानने तालिबानचा मार्ग अवलंबला; महिला शिक्षकांना जीन्स घालण्यावर घातली बंदी!


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -