घरठाणेकेडीएमसीला प्रकल्पांच्या नावाखाली २० कोटी ७० लाखाला चुना, पोलिसांकडे तक्रार

केडीएमसीला प्रकल्पांच्या नावाखाली २० कोटी ७० लाखाला चुना, पोलिसांकडे तक्रार

Subscribe

कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेला ठेकेदार असणार्‍या तिघा भागीदारांनी 20 कोटी 70 लाख रुपयांचा चुना लावल्याचे उघड झाले असून याबाबत कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांनी खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये फसवणूकी संदर्भात मेसर्स एस. एम. असोसिएट भागीदार मॅथ्यू जॉन कुचिन, अनिल चंदुलाल शहा व सीमा अनिल शहा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून महापालिकेचा सावळ्या गोंधळचा नमुना 16 वर्षानंतर उजेडात आल्याने याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिका प्रशासनाने 2005 मध्ये मेसर्स एस. एम. असोसिएट या संस्थेला ठेका दिला होता. मात्र भागीदार असणार्‍या या ठेकेदारांनी काम अपूर्ण करून बनावट कागदपत्रांचा दस्तऐवज बनवून याच कंपनीला अनुसरून दुसरी कंपनी बनवून 20 कोटी 69 लाख 64 हजार 584 रुपयांची अफराताफर करून पालिका प्रशासनाचे आर्थिक नुकसान केले होते. पालिकेचे कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांनी कंपनी व तिघ्या भागीदारांनी पालिका प्रशासनाच्या मालमत्तेवर अनधिकृतपणे कब्जा करत त्यावर कोटी रुपयांचे कर्ज घेऊन ते तिसर्‍या कंपनीस देऊ केले.
महापालिका क्षेत्रात राज्य शासनाने व महापालिका प्रशासनाने कल्याणकारी उद्देशाने सर्वसामान्य जनतेचा व्यापक हिताकरता मेसर्स एस. एम. असोसिएट यांना प्रकल्प पूर्ण करण्यासाठी कामे दिली होती. मात्र प्रकल्प पूर्ण न करता त्यामध्ये दिरंगाई करून भागीदारांनी कंपनीच्या एका सारखा नावाचा फायदा उठवत पालिकेला फसविले आहे.

- Advertisement -

एस. एम. असोसिएट भागीदारांनी नियम करारनामे प्रकल्पांवर अवैधपणे कर्ज घेऊन थर्ड पार्टीचे हक्क प्रस्थापित केले. तसेच शासनाचे भाडे थकवून न्यायालयातील लिटीगेशन करून शासनाच्या कल्याणकारी योजनेत कमालीची बाधा निर्माण करून सर्वसामान्य जनता सुखसोईंपासून वंचित राहील, असे कृत्य करून खोटी कागदपत्रे सादर केले. त्यांनी जागा भाडे व त्यावरील व्याजापोटी मेसर्स एम. एसचे भागीदार मॅथ्यू जॉन कुचीन, अनिल चंदुलाल शहा व सीमा अनिल शहा यांच्या विरोधात फसवणूक झाल्या संदर्भात कार्यकारी अभियंता तरुण जुनेजा यांनी खडकपाडा पोलीस ठाण्यात त्रिकृटाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हे विभागाचे पोलीस इन्स्पेक्टर शरद जिने याबाबत पुढील तपास करत आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -