घरट्रेंडिंग#MeToo मुळे सेक्रेड गेम्सचा दुसरा सीझन लटकला

#MeToo मुळे सेक्रेड गेम्सचा दुसरा सीझन लटकला

Subscribe

सध्या भारतामध्ये सुरु असलेल्या मी टू मोहिमेमुळे नेटफ्लेक्सवरील सेक्रेट गेम्स २ च्या प्रदर्शनातही अडथळा निर्माण झाला आहे. या वेबसीरीजचा सहलेखक वरुण ग्रोवर याच्यावरची लैंगिक अत्याचाराचा आरोप झाला असून त्यामुळे या वेबसीरीजचे प्रदर्शन लांबवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नेटफ्लेक्सवरील लोकप्रीय भारतीय सीरीज सेक्रेड गेम्सच्या दुसऱ्या सीझनची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र सध्या सुरु असलेल्या मी टू मोहिमेमुळे या वेबसीरीजचा दुसरा सीझन लटकणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. सेक्रेट गेम्सचा सहलेखक वरुण ग्रोवर याच्यावर लावण्यात आलेल्या लैंगिक अत्याचाऱ्याच्या आरोपामुळे या वेबसीरीजच्या दुसऱ्या भागाटे प्रदर्शन लांबणीवर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्टँडअप कॉमेडियन आणि लेखक वरुण ग्रोवर याने २०१५ साली आलेल्या मसान या चित्रपटाची कथा लिहिली होती. या चित्रपटाचे समीक्षकांनीही कौतुक केले होते. चित्रपटात अभिनेता विकी कौशलने प्रमुख भूमिका साकारली होती.

ट्विटरवरून केले आरोपाचे खंडन 

भारतातील पहिली ओरिजनल वेबसीरीज म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सेक्रेट गेम्सचे वरुण ग्रोवर हे सह पटकथा लेखक आहेत. तर याचे दिग्दर्शन अनुराग कश्यप यांनी केले आहे. मात्र आता वरुण ग्रोवरवर लैंगिक अत्याचाराचा आरोप करण्यात आला असून मीटू मोहिमेअंतर्गत हा मुद्दा उपस्थित होत आहे. त्यामुळे वरुणच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. या आरोपाचे वरुण यांनी खंडन केले असून त्यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून याचे स्पष्टीकरण दिले आहे.

- Advertisement -

दुसऱ्या भागाची उत्सुकता

या वेबसीरिजच्या दुसऱ्या सीझनच्या निमित्ताने अनेक दिग्गज कलाकार एकत्र येणार आहेत. सैफ अली खान, नवाजुद्दीन सिद्दीकी आणि राधिका आपटे यांची वेगळी रूप प्रेक्षकांसमोर येणार आहेत. ‘सेक्रेड गेम्स’मधील अनेक पात्र यशस्वी झाले. त्या पात्रांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं वेगळं स्थान निर्माण केलं. त्यातीलच एक विशेष गाजलेलं पात्र म्हणजे ‘गणेश गायतोंडे’. गणेश गायतोंडे हे पात्र साकारलं होतं नवाजुद्दीन सिद्दीकीने. नवाजने साकारलेल्या गायतोंडेमुळे त्यांनी प्रेक्षकांना आपलसं केलं.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -