घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रखूनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा जामीनावर सुटताच खून

खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा जामीनावर सुटताच खून

Subscribe

नशिराबादजवळील घटना, पूर्ववैमनस्यातून हल्ल्याची शक्यता

जामीनावर सुटलेल्या खूनाच्या गुन्ह्यातील आरोपीचा अज्ञात टोळक्याने केलेल्या सशस्त्र हल्ल्यात मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना जळगाव जिल्ह्यातील नशिराबादनजीक आज (दि.२१) घडली. या घटनेत मृताचे वडील जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे जळगावातील टोळीयुद्धाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धम्मप्रिय उर्फ धम्म मनोहर सुरडकर (२०, रा. पंचशील नगर, भुसावळ) हा मोटरसायकलने वडील मनोहर सुरडकर यांच्यासह भुसावळ येथे जात होता. सायंकाळच्या सुमारास अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार आणि चॉपरने केलेल्या हल्ल्यात धम्मप्रिय जागीच ठार झाला. तर, मनोहर सुरडकर हे गंभीर जखमी झाले. हा हल्ला पूर्ववैमनस्यातून झाल्याचे पुढे आले आहे.

- Advertisement -

धम्मप्रिय याच्याविरुद्ध भुसावळ बाजारपेठ पोलिसांत खूनाचा गुन्हा दाखल असून, या गुन्ह्यात त्याला जामीन मिळाल्यानंतर तो घराकडे निघाला होता. ११ महिन्यांपासून तो जेलमध्ये होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. पोलीस हल्लेखोराचा शोध घेत असून, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडालीय.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -