घरताज्या घडामोडीLive Update: अनिल परबांची किरीट सोमय्यांविरोधात हायकोर्टात याचिका

Live Update: अनिल परबांची किरीट सोमय्यांविरोधात हायकोर्टात याचिका

Subscribe

कोकण बोर्ड लॉटरी -2021

आज संध्याकाळी 05.14 पर्यंत कोकण बोर्ड लॉटरीसाठी एकूण सदनिका 8,984 आल्यात.
नोंदणीची संख्या – 1,21,361
अर्जांची संख्या – 1,48,634
अर्जांची संख्या EMD पेड) – 1,10,563

- Advertisement -

नोंदणीची करण्याची शेवटची तारीख 22 सप्टेंबर रात्री 11.59 पर्यंत असणार आहे. तर नोंदणीकृत अर्जदारांसाठी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 23 सप्टेंबर रात्री 11.59 पर्यंत असणार आहे.


परमबी सिंग यांच्या अडचणीत वाढ, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ओपन इन्कवायरी होणार

- Advertisement -

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबी सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली आहे, महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अजून एका प्रकारणात “ओपन इन्कवायरी” केली जाणार आहे..”ओपन इन्कवायरी” करण्याची परवानगी राज्य सरकार कडून मिळाली असून लवकरच या “ओपन इन्कवायरी” सुरुवात होणार आहे..

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडून परमबीर यांच्या विरोधात याआधी एका प्रकरणात चौकशी सुरू आहे पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी परमबीर सिंग वर आरोप लावले होते गेल्यावर्षी जेव्हा त्यांना निलंबित करण्यात आले होता तेव्हा परमबीर सिंग यांनी त्यांच्या एका माणसाच्या माध्यमाने अनुप डांगे यांना पुन्हा कामावर रुजू करून घेण्यासाठी 2 कोटी रुपयांची मागणी केली होती..या प्रकरणात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कडून चौकशी सुरू आहे..

दुसरी चौकशी ही पोलीस निरीक्षक बी आर घाडगे यांच्या तक्रारीनंतर सुरू करण्यात आली आहे.. महाराष्ट्राला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून परमबीर यांची चौकशी करण्यासाठी बी आर घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक, लाचलूचपत प्रतिबंधक विभागला पत्र लिहिलं होतं. बी आर घाडगे के तेच अधिकारी आहेत ज्यांच्या तक्रारीनंतर परमबीर सिंग वर सर्वप्रथम एप्रिल महिन्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता.परमबीर सिंह यांच्यावर अपराधी षड्यंत्र, पुरावे नष्ट करणे, आणि ऍट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला होता.


अनिल परबांची किरीट सोमय्यांविरोधात हायकोर्टात याचिका


ज्येष्ठ कलाकार विद्याधर करमरकर यांचे निधन झाले आहे. वयाच्या ९६ व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. विद्याधर करमरकर यांनी अनेक हिंदी, मराठी चित्रपटात काम केले आहे. त्यासोबत अनेक जाहिरातीतही ते झळकले होते. आबा म्हणून त्यांना संपूर्ण सिनेसृष्टीत ओळखले जायचे. ‘उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली…’या जाहिरातीतील ‘अलार्म काका’ म्हणून ते फार प्रसिद्ध होते.


नरेंद्र गिरी यांच्या सुसाईट नोटमध्ये शिष्य आनंद गिरींच्या नावाचा उल्लेख. यामध्ये आद्या तिवारी, संदीप तिवारींच्या नावाचाही उल्लेख


महा टीईटी परीक्षा आता पुढे ढकलण्यात आली आहे. परीक्षेचं आयोजन १० ऑक्टोबरला करण्यात येणार होतं. मात्र, काही विद्यार्थ्यांच्या त्याच दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा असल्यानं राज्य सरकारच्या परवानगीनं टीईटी परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता टीईटी परीक्षा ३१ ऑक्टोबरला  होणार


कोकणात पुढील २ दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस, आज संपूर्ण कोकणासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून उद्या उत्तर कोकणात मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे. पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडमध्ये काही ठिकाणी मुसळधार पाऊस, चारही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी


ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी किरीट सोमय्या ईडी कार्यालयात दाखल झाले.


करुणा शर्मा यांना २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर झाला आहे. आज अंबाजोगाई कोर्टात याप्रकरणाची सुनावणी पार पडली.


पॉर्नो फिल्मप्रकरणी अटक करण्यात आलेल्या राज कुंद्राचा जामीन काल, सोमवारी कोर्टाने मंजूर केला. त्यानंतर आज २ महिन्यांनंतर राज कुंद्रा तुरुंगातून बाहेर आला आहे. ५० हजाराच्या जातमुचलक्यावर राज कुंद्राला जामीन मिळाला आहे.


भाजप नेते किरीट सोमय्या आज दुपारी २ वाजता मुंबई ईडीकडे मुश्रीफांच्या घोटाळ्याची तक्रार दाखल करणार आहेत. याबाबत त्यांनी स्वतः ट्वीट करून माहिती दिली आहे.


देशात गेल्या २४ तासांत २६ हजार ११५ नव्या रुग्णांची वाढ झाली असून २५२ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर ३४ हजार ४४६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. देशातील आता एकूण कोरोनाबाधितांची संख्या ३ कोटी ३५ हजार ४ हजार ५३४वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत ४ लाख ४५ हजार ३८५ जणांचा मृत्यू झाला असून ३ कोटी २७ लाख ४९ हजार ५७४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या देशात ३ लाख ९ हजार ५७५ जणांवर उपचार सुरू आहेत.


२० सप्टेंबरपर्यंत देशात ५५ कोटी ५० लाख ३५ हजार ७१७ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत. यापैकी काल, सोमवारी दिवसभरात १४ लाख १३ हजार ९५१ नमुन्यांच्या चाचण्या झाल्या आहेत, अशी माहिती आयसीएमआरने दिली आहे.


अहमदनगरच्या संगमनेर बस स्थानकात एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येमुळे एकच खळबळ उडाली आहे. मुक्कामी थांबलेल्या बसमध्येच या एसटी चालकाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. प्राथमिक माहितीनुसार, कर्जाला कंटाळल्यामुळे एसटी कर्मचाऱ्याने टोकाचे पाऊल उचलले आहे.


भाजप नेते किरीट सोमय्या आज ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात ईडीकडे तक्रार दाखल करणार आहेत.


मुंबईत मर्यादित लससाठा उपलब्ध असल्याने आज ७३ मनपा आणि शासकीय केंद्रांवरच कोविड लसीकरण होणार आहे. उद्यापासून सर्व केंद्रावर लसीकरण होणार आहे


केंद्रीय मंत्रालयाने नक्षलवादविषयी महत्त्वाची बैठकीचं आयोजन केलं आहे. नक्षलग्रस्त राज्याच्या मुख्यमंत्र्यांसोबत रविवारी ही बैठक बोलावली आहे. यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीत जाणार आहे. काल, सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नक्षलवादविषयी आढावा बैठक घेतली होती. त्यानंतर आता राष्ट्रीय स्तरावर बैठक होणार आहे.


महापालिकेच्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाची जोरदार तयारी सुरू आहे. यानिमित्ताने आजपासून मनसे नेते अमित ठाकरे, तर उद्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर जाणार आहेत. यादरम्यान महत्त्वाचा पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.


मराठवाड्यात आजपासून तीन दिवस वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची अंदाज वर्तवण्यात आला आहे. मुंबईसह ठाणे आणि उपनगरात अधूनमधून मुसळधार पाऊस हजेरी लावत आहे. मुंबई आज सकाळी साडे सहाच्या दरम्यान जोरदार पाऊस आला होता.


काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज पत्रकार परिषद घेणार आहे. दादर येथील टिळक भवन येथे दुपारी २ वाजता नाना पटोले यांची पत्रकार परिषद पार पडणार आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -