घरट्रेंडिंगस्टॅच्यू ऑफ युनिटी: 'लिफ्ट' असलेला जगातील सर्वात उंच पुतळा

स्टॅच्यू ऑफ युनिटी: ‘लिफ्ट’ असलेला जगातील सर्वात उंच पुतळा

Subscribe

'गुजरात विधानसभेमध्ये १८२ सीट्स असल्यामुळे, वल्ल्भ भाई यांच्या या पुतळ्याची उंची १८२ मीटर ठेवण्यात आली आहे', अशा चर्चा रंगत आहेत.

सरदार वल्लभाई पटेल यांच्या भव्य पुतळ्याचं आता जवळपास पूर्ण झालं असून, पुतळ्यावर शेवटचा हात फिरवला जात आहे. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ असं या पुतळ्याचं नाव असून, त्याची उंची तब्बल १८२ मीटर इकती आहे. विशेष म्हणजे हा पुतळा जगातील सर्वात उंच पुतळा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ३१ ऑक्टोबर रोजी या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. गुजरातच्या वडोदराजवळ असलेल्या नर्मदा जिल्ह्यातील सरदार सरोवरावर हा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचं आणखी वैशिष्ट्यं म्हणजे यामध्ये चक्क लिफ्ट बसवण्यात आली आहे. या लिफ्टच्या साहाय्याने पर्यटक थेट वल्ल्भाई पटेल यांच्या ऱ्हदयापर्यंत पोहचू शकतात. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ हा जगातली पहिल्या क्रमांकाचा सर्वाच उंच पुतळा असून, दुसऱ्या क्रमांकावर चीनमधील १२८ मीटर उंचीची स्प्रिंग बुद्धाची प्रतिमा आहे. या पुतळ्याची भव्यता इतकी आहे की पर्यटकांना तो ७ किलोमीटर दुरवरूनच दिसणार आहे. दरम्यान ‘गुजरात विधानसभेमध्ये १८२ सीट्स असल्यामुळे, वल्ल्भ भाई यांच्या या पुतळ्याची उंची १८२ मीटर ठेवण्यात आली आहे’, अशा चर्चा रंगत आहेत.


‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’ची वैशिष्ट्ये :

  • जगातील सर्वात उंच पुतळा
  • चेहऱ्याची उंची सात मजली इमारतीएवढी
  • ७० फूट लांबीचे हात, पायाची उंची ८५ फुटांपेक्षा अधिक
  • एका व्यक्तीच्या उंचीइतके मोठे डोळे, ओठ आणि शर्टाची बटणं

उपलब्ध माहितीनुसार या भव्य पुतळ्याची उभारणी करण्यासाठी एकूण ५ वर्षांचा कालावधी लागला. याशिवाय पुतळाची निर्मिती करण्यासाठी तब्बल २ हजार ९८९ करोड रुपये इतका खर्च झाला. विशेष म्हणजे निर्माणकर्त्यांनी हा पुतळा भूकंपरोधक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने बनवला आहे. त्यामुळे ६.५ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाचा आणि २२० किमी प्रतितास वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांचा काहीच परिणाम होणार नाही. वल्लभ भाई पटेल यांची ही भव्य प्रतिमा उभारण्यासाठी ४ हजार ७६ कर्मचऱ्यांचे मनुष्यबळ लागले, ज्यामध्ये २०० कर्मचारी चीनचे होते.


 पाहा: ‘हा’ गोंडस Video, जो इंटरनेटवर होतोय व्हायरल

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -