घरट्रेंडिंग'हा' गोंडस Video, तुम्ही पाहिलात का?

‘हा’ गोंडस Video, तुम्ही पाहिलात का?

Subscribe

वडीलांच्या सूरात सूर मिसळण्याचा आणि त्यांच्या शब्दांशी जुळवून घेण्याचा या मुलीचा गोंडस प्रयत्न, सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे.

‘सोशल मीडिया’ हे आजच्या तारखेला सर्वात ताकदवर आणि लोकप्रिय माध्यम बनलं आहे. सोशल मीडियावर कोणती गोष्ट कधी व्हायरल होईल याचा काहीच नेम नसतो. ‘चाय पिलो’ म्हणणाऱ्या आंटीचा व्हिडिओ तुम्हाला आठवतच असेल. गेल्या काही  आजकाल कॅमेरा आणि मोबाईल या गोष्टी सर्वांकडे अगदी सहज उपलब्ध असतात. त्यामुळे लोक कुठलीही गोष्ट लगेच शूट करुन ती सोशल मीडियावर शेअर करतात आणि बघता बघता तो व्हिडिओ किंवा फोटो जगभरात व्हायरल होतो. गेल्या काही दिवसांपासून असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होतो आहे. या व्हिडिओमध्ये एक छोटीशी आणि तिचे वडील एक इंग्रजी गाणं गात आहेत. बहुधा नुकतेच अंघोळ करुन आलेले बाबा आणि त्यांची गोंडस मुलगी आरशात पाहून गाताना आपल्याला दिसतायत. वडील गात असलेलं गाणं कॉपी करण्याचा आणि त्यांच्या शब्दांशी शब्द जुळवण्याचा त्या मुलीचा गोंडस प्रयत्न, सर्वांचच लक्ष वेधून घेत आहे. अवघ्या काही दिवसांतच या व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले आहेत. जगभरातील लोक त्या मुलीचं आणि तिच्या गोंडस गाण्याचं कौतुक करत आहेत. तुम्हीही पाहा हा व्हिडीओ :


अरे बापरे: आकाशात बंद पडले अंतराळयान, पुढे झाले काय…

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -