घरदेश-विदेशभारताच्या १०० कंपन्यांमध्ये गुंतवणूक होणार - दसॉल्ट

भारताच्या १०० कंपन्यांमध्ये गुंतवणूक होणार – दसॉल्ट

Subscribe

दसॉल्ट कंपनी भारतातील १०० कंपनींशी ३० हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे. यामध्ये १० टक्के गुंतवणूक रिलायन्सशी असणार आहे.

काही दिवसांपासून देशाच्या राजकीय वर्तुळात राफेल करारासंबंधित चर्चांना उधान आले आहे. या करारावर कुणी सरकारवर ताशेरे ओढले तर कुणी सरकारचे समर्थन केले. आता याच बाबतीत फ्रान्सच्या खुद्द दसॉल्ट कंपनीने आपली प्रतिक्रीया नोंदवली आहे. दसॉल्ट कंपनीचे सीइओ एरिक ट्रॅपियर यांनी एफपी या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले की, राफेल करारानुसार भारतातील १०० कंपन्यांमध्ये दसॉल्ट कंपनी ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून, यामध्ये रिलायन्स कंपनीशी होणारी गुंतवणूक ही एकूण गुंतवणूकीपैकी १० टक्के असणार आहे.

‘ऑफसेट क्लॉज’मुळे दसॉल्टला गुंतवणूक करणे बंधनकारक

राफेल करार करताना ‘ऑफसेट क्लॉज’ ठेवण्यात आला आहे. या कारारानुसार भारत सरकारने खरेदी केलेल्या राफेलती किंमत ५९ हजार कोटी रुपयांची आहे. ज्या फ्रान्स कंपनीशी देशाने करार केला आहे, त्या कंपनीचे नाव दसॉल्ट कंपनी असे आहे. या करारानुसार दसॉल्ट कंपनीला देशातील कंपनींसोबत ५० टक्के रकमेची गुंतवणूक करणे बंधनकारक आहे. याचाच अर्थ असा की, दसॉल्टला ३० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक देशातील कंपन्यांमध्ये करणे गरजेचे आहे. त्यानुसार रिलायन्सशी १० टक्के गुंतवणूक देखील दसॉल्टने केली आहे. मात्र, देशात सुरु असलेल्या राजकीय गदारोळानंतर दसॉल्टने ही गुंतवणूक देशातील १०० कंपन्यांशी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. यामध्ये टाटा, महेंद्रा आणि इतर बड्या-छोट्या कंपनींचा देखील समावेश असणार आहे. शिवाय, रिलायन्सशी केलेला कारार हा कुठल्याही दबावाखाली केलेला नाही, असेही दसॉल्ट कंपनीचे सीइओ एरिक ट्रॅपियर यांनी स्पष्ट केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -