घरताज्या घडामोडीMaharashtra Monsoon: पुढील ४ दिवसात राज्यात मुसळधार पाऊस - IMD

Maharashtra Monsoon: पुढील ४ दिवसात राज्यात मुसळधार पाऊस – IMD

Subscribe

६ ऑक्टोबरपासून वायव्य भारतातील काही भागात मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू

राज्यात परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले आहे. गेल्या काही दिवसात गुलाब चक्रीवादळ आणि शाहीन चक्रीवादळाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना मुसळधार पाऊस झाला. मराठवाड्याला या पावसाचा सर्वाधिक फटका बसला. विजांच्या कडकडाटासह, जोरदार झालेल्या पावसाने अनेक पिकांचे देखील नुकसान झाले. ऑक्टोबर महिन्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. आज मुंबई सह उपनगरात पावसाने सुट्टी घेतली असली तर उद्यापासून पुढील चार दिवस राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. तर अनेक विदर्भात मेघगर्जनेसह पाऊसाची शक्यता असून मध्य महाराष्ट्र,मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडासह मुसळधार पावसाची शक्यता आहे.

- Advertisement -

पुढील चार ते पाच दिवसात राज्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी बाहेरची कामे टाळा, पाऊस सुरू असताना घराबाहेर पडल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो म्हणून घराबाहेर पडू नका. अशा प्रकारचे तीव्र हवामान संपूर्ण दिवस असेल,असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

गेल्या ४-५ दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने चांगलाच हाहाकार माजवला. कोकणात कमाल तापमान हे सरासरीच्या १ ते ३ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले तर मराठवाड्यासह विदर्भात देखील पावसाचा जोर वाढल्याचे पहायला मिळाले. गेल्या २ दिवसांपासून राज्यात उष्णतेचे प्रमाण वाढल्याचे पहायला मिळत आहे. ६ ऑक्टोबरपासून वायव्य भारतातील काही भागात मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होणार आहे. पावसाळा संपून हिवाळा ऋतू सुरू होणार आहे त्यामुळे या काळात उष्णतेत वाढ होत आहे.

- Advertisement -

हेही वाचा – मुंबई वगळता राज्यात गरबा! कोरोना नियमांचे पालन करत रंगणार रास दांडिया

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -