घरमुंबईमुंबई वगळता राज्यात गरबा! कोरोना नियमांचे पालन करत रंगणार रास दांडिया

मुंबई वगळता राज्यात गरबा! कोरोना नियमांचे पालन करत रंगणार रास दांडिया

Subscribe

कोरोना संसर्गाच्या साथीमुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही मुंबईकरांना गरबा खेळता येणार नसला तरी राज्य सरकारने मुंबईबाहेर गरबा खेळण्यास परवानगी दिली आहे. त्यासाठी कोरोना नियमांच्या अटी घालून दिल्या आहेत.

येत्या गुरुवारपासून (७ ऑक्टोबर) राज्यात शारदीय नवरात्रोत्सवाला प्रारंभ होत आहे. कोरोनाच्या तिसर्‍या लाटेचा धोका कायम असल्याने यंदाही गरबा खेळता येणार किंवा कसे याविषयी गरबाप्रेमींमध्ये संभ्रम होता. या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी मुंबई सोडून राज्यभरात गरबा खेळता येणार असल्याचे जालना येथे प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. परंतु त्यासाठी कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

मुंबई वगळता राज्यभरात गरबा खेळण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाची मान्यता आहे. त्यामुळे तीन पद्धतीने गरबा साजरा होईल. खुल्या मैदानात, सभागृहांमध्ये गरबा खेळला जातो. खुल्या मैदानात गरबा खेळताना सोशल डिस्टन्सिंग तसेच मास्कचा वापर करता येणार आहे. सभागृहात गरबा खेळताना त्याच्या क्षमतेपेक्षा ५० टक्केच लोक येतील याची दक्षता घ्यावी लागेल. याबरोबरच कोरोना संदर्भातील सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करावे लागेल, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

मुंबईत मात्र गरबा अथवा दांडिया खेळायला बंदी घालण्यात आली आहे. गरबा आणि दांडियाच्या दरम्यान अनेक लोक एकत्र येतात. त्यामुळे मोठी गर्दी होते. परिणामी कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे मुंबईत गरबा अथवा दांडिया खेळण्यास मनाई करण्यात आली आहे. मुंबईत प्रामुख्याने मोठ्या मैदानात गरबा, दांडियाचे आयोजन करण्यात येते. मात्र, गेल्यावर्षी प्रमाणे यावर्षीही दांडिया, गरब्यावर बंदी घालण्यात आल्यामुळे गरबाप्रेमींचा हिरमोड झाला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -