घरताज्या घडामोडीऑनलाईन मोबाईल गेममुळे मुलांचे मानसिक आरोग्य धोक्यात

ऑनलाईन मोबाईल गेममुळे मुलांचे मानसिक आरोग्य धोक्यात

Subscribe

सध्या फ्री फायर,लुडो,पब्जी या खेळाच्या ऑनलाईन स्पर्धांना उधाण आले आहे.

सध्या फ्री फायर,लुडो,पब्जी या खेळांनी तरुण,तसेच अल्पवयीन मुलांना झपाटले आहे. या खेळांच्या दुष्पपरिणामांविषयी जनजागृत करण्यासाठी शाळा – महाविद्यालयात प्रयत्न सुरु करत आहेत. मात्र दुसरीकडे या खेळाच्या ऑनलाईन स्पर्धांना  उधाण आले आहे. लाखो रुपयांचा बक्षिसांचे अमिष दाखविले जात असल्याने भावी पिढी मानसिकदृष्ट्या अकार्यक्षम होत चालल्याचे भयानक वास्तव समोर येताना दिसत आहे. पब्जीवर बंदी आल्यानंतर फ्री फायर हा ऑनलाईन खेळ पालक आणि शिक्षकांसाठी चिंतेची बाब ठरला आहे. या खेळामुळे तरुणांमध्ये नैराश्य आणि मानसिक ताण वाढत असल्याचे दिसून येत आहे. तसेच रोज रात्री १० ते २ यावेळेत अनेक यु-ट्यूब वाहिन्यांवर हिंदी आणि मराठीत या खेळांच्या सामन्याचे थेट प्रक्षेपण करण्यात येते. दररोज ४० ते ५० हजार तरुण थेट प्रक्षेपण पाहतात. वाहिन्यांवर समालोचन करणारे तरुण हे नवे पब्जी स्टार म्हणून उदयास येत आहेत. त्यांना संकेतस्थळाच्या माध्यमातून २० रुपयांपासून ते १५ हजार रुपयांपर्यतची रक्कम टीप दिली जाते.

ऑनलाइन वॉर रूम

अभ्यास आणि सर्व दैनंदिन कामे संपवून नंतरच पब्जी, लुडो गेम खेळावा. मैदानी खेळ हे मोबाईल खेळांपेक्षा महत्त्वाचे आहेत. कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानिकारक असतो. मात्र ते आपण कितपत मनावर घ्यायचे हे स्वतः ठरविले पाहिजे. स्पर्धेसाठी ऑनलाईन वॉर रूम तयार करण्यात येते. स्पर्धा 3 ते 4 तास चालते. शेवटी ऑनलाईन जिवंत राहणार्‍या स्पर्धकाला 5 हजारांपासून ते 1 कोटी रुपयांपर्यंत बक्षीस मिळत असल्याचे सोशल मीडियावर सांगण्यात येते.

- Advertisement -

मोबाईलच्या अतिवापाराचे ‘हे’ आहेत धोके…

सतत मोबाईल स्क्रीन पाहिल्याने लहान मुलांना याचा अधिक त्रास होतो. विशेषेत: डोळ्यातून पाणी येणे, डोके दुखणे, मायग्रेन, डोळे सुजणे असे नवे आजार होत आहेत. स्क्रीनच्या प्रकाशामुळे, किरणांमुळे केवळ डोळ्यांवर परिणाम होतो असे नाही तर जीवनाच्या अनेक चक्रावरही दुष्परिणाम होऊन रात्रीची झोपही कमी होण्याची शक्यता असते. ऑनलाइन अभ्यासाच्या नावाने लहान मुले तासन्-तास मोबाईल बघतात. अंधारामध्ये मोबाईल पाहण्याचे प्रमाण अधिक आहे.

आताची युवा पिढी ही मोबाईल वापरण्याचा अतिरेक करून असून, ती एक प्रकारची व्यसनाधिनता झाली आहे. मुले पब्जीसारखे खेळ खेळताना दिसतात. त्यामुळे त्यांच्या आपापसातील संवाद तुटत चालला आहे. याची विविध उदाहरण देत सोशल नेटवर्क किती घातक आहे, हे विद्यार्थांना पटवून दिले जाते. तसेच पालकांनी स्वत:सह आपल्या मुलांना मोबाईल व्यसनापासून दूर ठेवणे अत्यावश्यक आहे.
-डॉ. अर्चना सिंह, मानसोपचार तज्ज्ञ

- Advertisement -

 

 

वार्ताहर – रत्नाकर पाटील


हे ही वाचा – शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांना भाजपाकडून देगलूर विधानसभेसाठी उमेदवारी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -