घरताज्या घडामोडीPandora Papers : सचिन तेंडूलकरनंतर जैकी श्रॉफ नीरा राडिया, अनिल अंबानीचे नावं...

Pandora Papers : सचिन तेंडूलकरनंतर जैकी श्रॉफ नीरा राडिया, अनिल अंबानीचे नावं चर्चेत, काय आहे प्रकरण

Subscribe

पेंडोरा पेपर्स प्रकरणात भारतातील ३८० लोकांच्या नावाचा समावेश आहे.

इंटरनेशनल कंसोर्टियम ऑफ इन्वेस्टिगैटिव जर्नलिस्टच्या (icij) पेंडोरा पेपर्सच्या अहवालामुळे देशासह जगभरात खळबळ माजली आहे. देशातील नामवंत व्यक्ती, माजी क्रिकेट पटू सचिन तेंडूलकर, अनिल अंबानी यांच्यासह अनेक श्रीमंत व्यक्तींनी करचुकवेगिरी केली असल्याचे उघड झाले आहे. एका खासगी वृत्तवाहिनेने प्रसारित केलेल्या बातमीमुळे देशात एकच चर्चा सुरु झाली आहे. केंद्र सरकारने देखील या बातमीची दखल घेऊन ज्या लोकांची या प्रकरणात नावे समोर आली आहेत त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. तसेच भारतातील एकूण १५० पेक्षा अधिक माध्यम समूहांचा देखील समावेश आहे. आईसीआईजेने आपल्याकडे १.१९ करोडहून अधिक गोपनीय माहितीचे अहवाल असल्याचा दावा केला आहे.

पेंडोरा पेपर्स प्रकरणात यापुर्वीही माजी क्रिकेटपटू सचिन तेंडूलकरचे नाव चर्चेत आलं आहे. तर बायोकॉन प्रमुख किरण मजूमदार शॉचा पति जॉन शॉ याचेही नाव चर्चेत आलं आहे. या प्रकरणात जॉन शॉ यांचा संबंध नसल्याचे किरण शॉने म्हटलं आहे.

- Advertisement -

पेंडोरा पेपर्स प्रकरणात भारतातील ३८० लोकांच्या नावाचा समावेश आहे. यामध्ये सचिन तेंडूलकर, अनिल अंबानी, जैकी श्रॉफ, विनोद अदानी, नीरा राडिया, सतिश शर्मा यांच्या नावाचा समावेश आहे. याप्रकरणावर सचिन तेंडूलकरच्या वकिलांनी बाजू मांडली आहे. सचिन तेंडूलकरची गुंतवणूक अधिकृत आहे तर याबाबत टॅक्स अधिकाऱ्यांना देखील माहिती देण्यात आली आहे.

पेंडोरा पेपर्स प्रकरण समोर आल्यानंतर एकूण ९१ देशांमध्ये खळबळ माजली आहे. यामध्ये काही नेत्यांचा देखील समावेश आहे. आपली संपत्ति लपवण्यासाठी दुसऱ्या देशात तसेच बेटांवर आपल्या मालकीची कंपनी चालवून काळा पैसा सफेद करण्याचा आरोप करण्यात आला आहे.

- Advertisement -

काय आहे प्रकरण ?

जर कोणती व्यक्ती दुसऱ्या देशात कंपनी चालू करते तर त्याला ऑफ शोर कंपनी असे म्हणतात. ब्रिटिश वर्जिन आइलैंड बेटाला टॅक्स चोरीचं नंदनवन म्हटले जाते. म्हणजेच जिथे टॅक्स चोरी, टॅक्स वाचवणे आणि काळा पैसा सफेद करण्याचे अनेक पर्याय उपलब्ध असतात. सचिन तेंडूलकरची कंपनी याच ठिकाणी होती. हे आयसीआयजे म्हणजेच इंटरनैशनल कंसोर्टियम ऑफ इन्वेस्टिगेटिव जर्नलिस्ट्सच्या अहवालात समोर आलं आहे. सचिनची कंपनी २०१६ साली बंद करण्यात आली आणि त्यात असलेल्या सर्व शेअर धारकांना त्यांचे पैसे परत केल्याचा दावा सचिन तेंडूलकरच्या वकिलांनी केला आहे.

केंद्राकडून कारवाईचा इशारा

पेंडोरा पेपर्स प्रकरणात भारतातील नामवंत व्यक्तींची नावे समोर आली असून कर चुकवेगिरी केल्याचे वृत्त एका खासगी वृत्तवाहिनीने दिले आहे. या वृत्ताची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. केंद्र सरकारने म्हटलं आहे की, या प्रकरणात ज्या लोकांची नावे समोर आली आहे. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल. या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले असून दोषींवर कारवाई केली जाईल आणि सीबीडीटी, ईडी, आरबीआय आणि एफआययू या यंत्रणा तपासाचे काम करतील असे अर्थ मंत्रालयाकडून सांगण्यात आल आहे.


हेही वाचा : गुजरातमध्ये २१ हजार कोटींचं ड्रग्ज सापडलं त्यावर का सवाल विचारत नाही? – राऊत


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -