घरमहाराष्ट्रगुजरातमध्ये २१ हजार कोटींचं ड्रग्ज सापडलं त्यावर का सवाल विचारत नाही? -...

गुजरातमध्ये २१ हजार कोटींचं ड्रग्ज सापडलं त्यावर का सवाल विचारत नाही? – राऊत

Subscribe

बॉलिवडू अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान हा ड्रग्ज प्रकरणात सापडल्याने पुन्हा एकदा बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शन समोर आलं आहे. बॉलिवूड इंडस्ट्री मुंबईत असल्यामुळे मुंबईला टार्गेट केलं जात आहे. यावर शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी गुजरातमध्ये २१ हजार कोटींचं ड्रग्ज सापडलं त्यावर का सवाल विचारत नाही? असा परखड सवाल केला आहे. ते दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.

मुंबईत ११ ग्रॅम ड्रग्ज आलं कुठून? हा महत्त्वाचा प्रश्न आहे. बॉलिवूड, टॉलिवूड जे काही असेल ते सोडून द्या. पण या देशामध्ये गेल्या काही वर्षांपासून ड्रग्जचा पुरवठा होतोय तो कुठून होतोय? जम्मू-काश्मीर, गुजरातमध्ये ड्रग्ज सापडतात, महाराष्ट्रामध्ये ड्रग्ज सापडत आहेत. नोटबंदी करण्यामागचा मुख्य हेतू सरकारने सांगितला होता की अंमली पदार्थावरुन मिळणाऱ्या अतिरेक्यांच्या पैशांवर बंधणं येतील. तसंच, अंमली पदार्थांचा व्यापार थांबेल. उलट तो वाढला आहे. जगातील सगळ्यात मोठी खेप ही गुजरातमध्ये सापडली, त्यावर कोणीच प्रश्न विचारत नाही. त्यावर सरकार काहीच उत्तर देत नाही, असं राऊत म्हणाले. शेतकऱ्यांना चिरडण्याच्या विषयापेक्षा ११ ग्रॅम ड्रग्ज हा विषय मोठा नाही, असं राऊत म्हणाले.

- Advertisement -

पारतंत्र्यात अशा घटना घडतात

उत्तर प्रदेशमधील घटना ही राज्य, देशासह जगभरातील शेतकरी वर्गासंदर्भात एक कलंक आहे. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवरती गोळ्या घालणं, गाडी घालणं हे ब्रिटीश काळात झालं आहे. जगभरात जिथे गुलामी, पारतंत्र्य आहे तिथे अशा घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रात मुंबईमध्ये बाबू गेनू परदेशी कपड्याच्या विरोधात आंदोलनासाठी उतरला होता. त्याने ट्रक अडवला तर त्याच्या पोटावरुन गाडी घातली. जनरल डायरने पंजाबमध्ये अशाप्रकारे अत्याचार केले. यापेक्षा वेगळं लखीमपूर खेरीमध्ये वेगळं काय घडलं? हे आम्हाला तिथल्या सरकारने किंवा भाजपच्या सर्वोच्च नेत्यांनी समजवून सांगावं, एवढंच आमचं म्हणणं आहे, असं राऊत म्हणाले.


हेही वाचा – Lakhimpur Kheri Violence: महाराष्ट्रात घडलं असतं तर मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजपने तांडव केला असता – राऊत

- Advertisement -

 

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -