घरताज्या घडामोडीअमली पदार्थांची सर्रास तस्करी होताना गृहमंत्री झोपलेत का?, अतुल भातखळकरांचा सवाल

अमली पदार्थांची सर्रास तस्करी होताना गृहमंत्री झोपलेत का?, अतुल भातखळकरांचा सवाल

Subscribe

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून मुंबईत गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे.

एनसीबीने कोर्डेलिया क्रूझवर कारवाई करुन मोठ्या प्रमाणात अमली पदार्थाचा साठा जप्त केला आहे. एनसीबी कारवाई करत असताना राज्यातील गृहमंत्री झोपले आहेत का? असा सवाल भाजप नेते अतुल भातखळकर यांनी केला आहे. राज्यात वाढच चाललेली गुन्हेगारी मोडीत काढण्याचे सोडून ठाकरे सरकार टक्केवारी वसुली करण्यात व्यस्त असल्याची टीका भातखळकर यांनी केली आहे. मागील वर्षभरात एनसीबीने ४२हून अधिका ठिकाणी छापेमारी करत ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड केला आहे. परंतु राज्यातील गृह विभाग केवळ बघ्यांची भूमिका पार पाडत आहेत. गृहविभागाने तस्करी विरोधात कारवाई करणे अपेक्षित असल्याचे अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. या पत्रकात भातखळकर यांनी गृहविभागावर चांगलेत ताशेरे ओढले आहेत. भातखळकर यांनी म्हटलं आहे की, मुंबईत क्रुझवर सुरु असलेल्या पार्टीवर धाड टाकून मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ जप्त करण्याचे काम राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी दलाच्या विशेष पथकाकडून करण्यात आले, परंतु मुंबईत अशा प्रकारे अंमली पदार्थाची सर्रास तस्करी व वापर होत असताना महाराष्ट्राचे अंमलीपदार्थ विरोधी पथक आणि गृहमंत्री झोपले आहे काय? आपली जबाबदारी ओळखून राज्यात वाढत चाललेली गुन्हेगारीची पाळेमुळे मुळासकट मोडीत काढण्याचे सोडून ठाकरे सरकार हे केवळ टक्केवारी वसुली करण्यात मग्न असल्याचा आरोप आमदार अतुल भातखळकरांनी केला आहे.

- Advertisement -

भातखळकर यांनी पुढे म्हटलं आहे की, मागील वर्षभराच्या काळात राष्ट्रीय अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून ४२ पेक्षा अधिक ठिकाणी छापेमारी करून राज्यातील बॉलीवूड व उद्योग विश्वात वाढत चाललेल्या ड्रग्सच्या रॅकेट चा भांडाफोड करण्यात आला, किमान त्यांनंतर तरी राज्याच्या गृह विभागाकडून मुंबईसह महाराष्ट्रातील अंमली पदार्थांची पाळेमुळे शोधून काढण्याची आवश्यकता होती. परवा एनसीबी कडून टाकण्यात आलेल्या छाप्यात आर्यन खान सह अनेक युवकांना ताब्यात घेण्यात आले, त्यांच्याकडून मोठ्या अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. इतकेच नव्हे तर मागील दोन वर्षांपासून हे सर्व युवक अंमली पदार्थाचे सेवन करत असल्याचे उघड झाले आहे. मुंबई सारख्या शहरात इतकी देशविघातक कृत्ये होत असताना राज्याचा गृह विभाग केवळ बघ्याची भूमिका पार पाडत असल्याचे भातखळकर यांनी म्हटलं आहे.

गृह विभाग वसुलीमध्ये व्यस्त

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाकडून ड्रग्सचे उत्पादन व तस्करी या विरोधात जोरदार कारवाई करणे अपेक्षित असताना ते सुद्धा केवळ गृह विभाग मात्र हॉटेल व बार मालकांकडून वसुली करण्यात धन्यता मानत आहे. इतकेच नव्हे तर कॉंग्रेसचे नेते जयराम रमेश व इतर प्रवक्ते यांनी तर थेट आर्यन खानच्या बाजूने उभे राहत जणू अंमली पदार्थ तस्करी व सेवनाला कॉंग्रेसचा पाठींबा असल्याचे दाखवून दिले आहे.

- Advertisement -

ठाकरे सरकार आल्यापासून गुन्हेगारी वाढली

महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून मुंबईत गुन्हेगारीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे, दिवसा ढवळ्या खून, बलात्कार, उद्योजक व राजकीय नेत्यांना खंडणीसाठी धमक्या देणे, अपहरण या आणि अशा गुन्ह्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालेले आहे. राज्याचे गृहमंत्री हे केवळ सुडाचे राजकारण करण्यात मग्न असल्यामुळे किमान राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तरी मुंबईतील वाढत चाललेली अंमली पदार्थ व ड्रग्सची खुलेआम विक्री आणि गुन्हेगारी कमी करण्यासाठी विशेष लक्ष द्यावे असा खोचक सल्ला अतुल भातखळकर यांनी दिला आहे.


हेही वाचा : Cruise drug case: लाखो रूपयांचे MDM ड्रग्स जप्त, NCB कडून आणखी दोघांना अटक


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -