घरताज्या घडामोडीCruise drug bust : क्रूझ कारवाईतील मनीष भानूशालीचे भाजप कनेक्शन, मोदी, शाह,...

Cruise drug bust : क्रूझ कारवाईतील मनीष भानूशालीचे भाजप कनेक्शन, मोदी, शाह, फडणवीसांसोबत फोटो

Subscribe

एनसीबीला कॉर्डेलिया क्रूझवर कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज सापडले नाही. महाराष्ट्र एनसीबीने जे फोटो प्रसारित केले आहेत. ते दिल्लीच्या एनसीबीने दिलेले फोटो आहेत.

नार्कोटीक्स कंट्रोल ब्यूरो (NCB) मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझवर छापेमारी करत ड्रग्ज जप्त केले आहेत. यावेळी अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक करण्यात आली आहे. आर्यन खानला अटक करणारा एनसीबीचा अधिकारी आणि अरबाझ मर्चंटला अटक करणारा अधिकारी हे भाजपशी संबंधित असल्याचे आरोप राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी फोटोसह अधिकाऱ्यांचा भाजपशी संबंध असल्याचे दाखवले आहे. अरबाझ मर्चंटला अटक करणारा अधिकारी मनीष भानूशाली हा एनसीबीचा अधिकारी नसून भाजपचा नेता असल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले आहे. भानूशालीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबतचे फोटो देखील नवाब मलिक यांनी दाखवले आहेत.

राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केंद्रीय मंत्री यांनी एनसीबीने क्रूझवर केलेल्या कारवाईवर संशय व्यक्त केला आहे. नवाब मलिक यांनी क्रूझ ड्रग्ज प्रकरणावर केलेले वक्तव्ये आणि खुलाशामुळे आता ड्रग्ज प्रकरणाला वेगळं वळण लागले आहे. बॉलीवूड इडस्ट्रीला बदनाम करण्यात येत आहे. मलिक यांनी म्हटलं आहे की, ३ ऑक्टोबरच्या रात्री आम्ही टीव्हीवर बातम्या बघितल्या की, क्रूझवर एनसीबीने रेड केली. यानंतर चर्चा सुरु झाली. एका अभिनेत्याच्या मुलाला अटक करण्यात आली. सर्व माध्यमांनी या बातम्या दाखवल्या, एएनआयने काही व्हिडिओ दाखवले. ज्यामध्ये एनसीबी कार्यालयात आरोपींना नेताना व्हिडिओ दाखवण्यातआले. त्यानंतर झोनल अधिकारी म्हणतात की, आम्ही ८ ते १० लोकांना अटक करण्यात आली असल्याचे दाखवले असल्याचे मलिक यांनी सांगितले.

- Advertisement -

अधिकाऱ्याचे भाजप कनेक्शन

क्रूझवरुन आर्यन खानला अटक करणारा एनसीबीचा अधिकारी केपी गोसावीचा एक सेल्फी फोटो व्हायरल झाला होता. यानंतर एएनआयने दिल्लीच्या एनसीबीने अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सांगितले की, हा एनसीबीचा अधिकारी नाही. तसेच या अधिकाऱ्याचा आणि एनसीबीचा काहीही संबंध नाही. मग ही व्यक्ती कोण असा सवाल उपस्थित होत आहे. जर तो व्यक्ती अधिकारी नाही तर आर्यन खानला कसा ओढून नेऊ शकतो? हे एनसीबीने स्पष्ट करावे असे मलिक यांनी म्हटलं आहे.

दुसरा आरोपी आरबाझ मर्चंटला एनसीबी मरुम शर्टमधील एनसीबी अधिकारी मनीष भानुशाली ओढत नेत आहे. हा व्यक्ती एनसीबीचा अधिकारी नसून तो भाजपचा नेता आहे. भानुशालीचे पंतप्रधान मोदी, अमित शाह, जेपी नड्डा, फडणवीस, यांच्यासोबत फोटो आहेत. तर आशिष शेलार, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याशी देखील फोटो काढले आहेत. याबाबतचेही स्पष्टीकरण एनसीबीला द्यावे लागेल असे मलिक यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

झोनल डायरेक्टरच्या वक्तव्यावर प्रश्न

एनसीबी झोनल ऑफिसरने सांगितले की आम्ही ८ ते १० जणांना अटक केली आहे. यानंतर माहिती देण्यात आली की, ८ लोकं होते. एक अधिकारी सांगतो १० लोकं होते त्यानंतर तोच अधिकारी ८ असल्याचे सांगतो यामध्ये २ व्यक्तींना सोडण्यात आले किंवा २ लोकांना गोवण्यात येण्याची शक्यता होती. गोसावीचा झोनल डायरेक्टरसोबत संबंध काय, अधिकारी नाही तर तो कसा या प्रकरणात आहे. मनीष भानुशाली अधिकारी नाही तर आरोपींना कसे पकडले. एनसीबीला अधिकार आहे का, खासगी लोकांना छाप्यात काम करुन देण्याचा असेल तर कोणत्या अधिकाराअंतर्गत आहे.

क्रूझरवर ड्रग्ज सापडले नाही

एनसीबीला कॉर्डेलिया क्रूझवर कोणत्याही प्रकारचे ड्रग्ज सापडले नाही. महाराष्ट्र एनसीबीने जे फोटो प्रसारित केले आहेत. ते दिल्लीच्या एनसीबीने दिलेले फोटो आहेत. कोणत्याही शिपवरचे फोटो नाहीत. हे फोटो दिल्लीच्या एनसीबी केबिनच्या आतमधले आहेत. असा दावा मलिक यांनी केली आहे. छापेमारी केलेल्या ठिकाणी पंचनामा करण्यात येतो. जप्त करण्यात आलेली वस्तू एका रुममध्ये ठेवण्यात येते. जर त्या वस्तू दाखवायच्या असतील तर न्यायाधीशांच्या परवानगीने दाखवण्यात येतात परंतु अशा कोणत्याही प्रकारचे शिष्टाचार पाळण्यात आले नसल्याचा आरोप देखील नवाब मलिक यांनी केला आहे.

उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरीमध्ये आंदोलनकारी शेतकऱ्यांवर केंद्रीय मंत्र्याच्या मुलाने गाडी घातली यामध्ये काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे पडसाद आता देशभरात उमटले आहेत. राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक विकास मंत्री यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. केंद्रीय मंत्र्याला मंत्रीपदावरुन बरखास्त करण्यात यावे आणि त्यांच्या मुलाला अटक करण्यात यावी अशी मागणी नवाब मलिक यांनी केली आहे. शेतकऱ्यांवर गाडी घातल्याप्रकरणी केंद्रीय गृहराज्य मंत्र्यांच्या मुलावर ३०२ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे तर अटक का करण्यात आली नाही असा सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.


हेही वाचा : न्यायासाठी आवाज उठवणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडून मारलं जातंय – संजय राऊत


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -