घरताज्या घडामोडीलॉन्समध्ये सुरू असलेला बनावट देशी दारुचा कारखाना उद्ध्वस्त, एक कोटींचा मुद्देमाल जप्त

लॉन्समध्ये सुरू असलेला बनावट देशी दारुचा कारखाना उद्ध्वस्त, एक कोटींचा मुद्देमाल जप्त

Subscribe

चांदोरीच्या उदयराजे लॉन्समध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांची धडक कारवाई

निफाड तालुक्यातील नाशिक-औरंगाबाद राज्य मार्गावर असलेल्या चांदोरी शिवारात उदय राजे लॉन्समध्ये अवैधरित्या सुरू असलेला बनावट देशी दारूचा कारखाना नाशिक ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला. सोमवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास केलेल्या या कारवाईत सुमारे एक कोटीच्या मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून, संशयितांना ताब्यात घेतले आहे.

पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या पथकाने केलेली निफाड तालुक्यातील ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते आहे. पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार, सायखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा कारखाना सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यानंतर तातडीने स्वतंत्र पथकाने थेट लॉन्सवर छापा टाकत मुद्देमालासह संशयितांना ताब्यात घेतले. यावेळी संजय मल्हारी दाते (रा. गोंदेगाव, निफाड) या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्याच्या ताब्यातील बनावट देशी दारूचे अंदाजे दीड ते दोन हजार बॉक्स, अंदाजे १० ते १५ हजार देशी दारूच्या रिकाम्या बाटल्या, २० हजार लिटर स्पिरिट, २०० लीटरचे ९० ते १०० बॅरेल, अंदाजे ५ ते १० हजार रिकामे बॉक्स, देशी दारू बनवण्याचे साहित्य, ५ पाण्याच्या टाक्या, एक ट्रक असा एकूण १ कोटींचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. हा कारखाना अंबादास विठोबा खरात यांच्या मालकीच्या उदयराजे लॉन्समध्ये सुरू होता.

- Advertisement -

पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक ग्रामीण पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.  दरम्यान, घटनास्थळावरून पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध गन्हा दाखल केला.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -