घरताज्या घडामोडीT20 WC : मनसे इम्पॅक्ट, वर्ल्ड कप टी२० कॉमेंट्री आता मराठीमध्ये होणार

T20 WC : मनसे इम्पॅक्ट, वर्ल्ड कप टी२० कॉमेंट्री आता मराठीमध्ये होणार

Subscribe

वर्ल्ड कप टी२० चे समालोचन (commentary) आता मराठी भाषेमध्ये करण्यात येणार आहे. राज्यात मराठी भाषेसाठी नेहमीच आक्रमक राहिलेल्या मनसेनं पुन्हा एकदा आपला मराठीबाणा आणि मनसे इम्पॅक्ट दाखवला आहे. क्रिकेट सामन्यांचे समालोचन मराठी भाषेत करण्यासाठी मनसे नेते आणि कामगार सेनेचे चिटणीस केतन नाईक यांनी हॉटस्टारशी वारंवार पत्रव्यवहार करत क्रिकेट सामने, आयपीएलचे समालोचन मराठीमध्ये करण्यात यावे यासाठी मागणी केली होती. मनसेच्या मागणीला यश आले असून हॉटस्टारने मराठीत समालोचन/कॉमेंटरी करण्यास सुरुवात केली असून वर्ल्ड कपचेही मराठी भाषेत समालोचन करण्यात येणार आहे.

मनसेकडून वर्ल्ड कप टी२०चे समालोचन मराठी भाषेत व्हावे अशी मागणी केली होती. परंतु यंदा ही मागणी पूर्ण होऊ शकणार नाही अशी माहिती हॉटस्टारकडून देण्यात आली होती. मात्र एकदा मनसेनं एखादं प्रकरण हाती घेतल्यास कामगिरी फत्ते झाल्याशिवाय मनसे शांत राहत नाही. आता हॉटस्टारकडून वर्ल्ड कप टी२० समालोचन मराठी भाषेत करणार असल्याची माहिती ट्विट करुन देण्यात आली आहे. रविवार २४ ऑक्टोबरपासून भारत- पाकिस्तान सामन्यापासून वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे. या सामन्यांपासूनच मराठीत समालोचन करण्यात येणार आहे.

- Advertisement -

मराठी कॉमेंट्रीचा इतका हट्ट का? असा प्रश्न केला असता उत्तरात केतन नाईक म्हणाले, “विषय नुसता समालोचनाचा नसून त्यातून निर्माण होत असलेल्या अर्थकारणमुळे मराठी भाषेतील जाणकारांना रोजगार मिळणार असेल तर तो आम्हाला हवा आहे व अशा प्रकारचे काम राज साहेब ठाकरे त्यांना अपेक्षित असतं”, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रात मनसेच्या कोर्टात एखादं प्रकरण गेलं आणि त्याचा निकाल हा सकारात्मकच लागतो. केतन नाईक यांनी हॉटस्टारला मनसेचा दणका दाखवून कामगिरी पूर्ण केली आहे. मनसेकडून पुन्हा मराठी भाषेसाठी घेतलेल्या भूमिकेवरुन राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. महाविकास आघाडी केवळ नावापुरती मराठी भाषेला जपत आहे का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात उपस्थित झाला आहे.

- Advertisement -

हेही वाचा :  कॉंग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा पदाचा राजीनामा


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -