घरताज्या घडामोडीShah Rukh Khan Meets Aryan: २० दिवसानंतर बाप-लेकाची भेट, एकमेकांना पाहून ढसाढसा...

Shah Rukh Khan Meets Aryan: २० दिवसानंतर बाप-लेकाची भेट, एकमेकांना पाहून ढसाढसा रडले

Subscribe

बॉलिवूडचा अभिनेता शाहरुख खान आज, गुरुवारी सकाळी मुलगा आर्यन खानला भेटण्यासाठी आर्थर रोड कारागृहात पोहोचला होता. सर्व कायदेशीर गोष्टी पूर्ण करून शाहरुख खान लेकाला भेटण्यासाठी गेला होता. आधार कार्ड आणि अन्य कागदपत्रं तपासून शाहरुखला टोकन देऊन आर्यनला भेटण्यासाठी कारागृहात पाठवण्यात आले होते. यावेळी शाहरुख आणि आर्यनमध्ये १० ते १५ मिनिटं भेट झाली. यादरम्यान शाहरुख आणि आर्यनला एकमेकांना पाहून अश्रू अनावर झाले होते. त्याने आर्यनला लवकरच बाहेर येशील असे सांगितले. आर्यन अटकेनंतर २० दिवसांनी शाहरुख आर्यनला भेटला. यावेळी शाहरुख आणि आर्यनमध्ये काय बातचित झाली, वाचा. (Shah Rukh Khan and aryan both cried after meeting at Arthur Road Jail)

शाहरुख आणि आर्यनच्या भेटीदरम्यान एक पारदर्शी काच होती. त्यावेळेस तुरुंग विभागाचे अधिकारी त्यांच्या आसपास उभे होते. आर्यनला अटक झाल्यापासून त्याची ही शाहरुखसोबतची पहिलीच भेट होती. त्यामुळे दोघेही खूप भावूक झाले होते. शाहरुख आर्यनला म्हणाला की, ‘घरी सर्व व्यवस्थित असून तू स्वताची काळजी घे. वेळेवर जेवत जा. आम्ही तुला बाहेर काढण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत.’

- Advertisement -

पुढे शाहरुखने आर्यनच्या जामीन अर्जावर न्यायालयात काय सुरू आहे, याची माहिती त्याला दिली. शाहरुखने आर्यनला सांगितले की, ‘सत्र न्यायालयाने जामीन रद्द केला असून हायकोर्टात अर्ज केला आहे. तिथून लवकरच जामिनावर सुनावणी होईल तू लवकर बाहेर येशील विश्वास ठेव.’ यादरम्यान दोघं एकमेकांशी बोलताना सतत दोघांच्या डोळ्यातून अश्रू बाहेर येत होते. दोघांच्या बोलण्यात देखील हे जाणवत होते.


हेही वाचा – Aryan Khan Drugs Case: आर्यन खानचा कारागृहातील मुक्काम वाढला; मंगळवारी जामीन अर्जावर होणार सुनावणी


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -