घरलाईफस्टाईलगरबा खेळणार्‍यांसाठी विशेष डाएट

गरबा खेळणार्‍यांसाठी विशेष डाएट

Subscribe

नवरात्रात गरबा खेळणे आज गावोगावची परंपरा होऊ लागली आहे.शहरांमध्ये तर यासाठी खास व्यवस्था केली जाते. परंतु अनेक तास नृत्य केल्यामुळे आपल्या एनर्जी लेवलवर त्याचा खूप परिणाम होत असतो. अशावेळी स्टॅमिना टिकवून ठेवण्यासाठी डाएटमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे. जाणून घेऊया त्याविषयी सविस्तर

* गरबा रात्री उशिरापर्यंत चालत असतो. यासाठी या दिवसातही आठ तास संपूर्ण झोप घ्यावी.

* जर रात्री उशिरापर्यंत झोपत असाल तर दिवसा झोप पूर्ण करावी.

- Advertisement -

* गरबा खेळताना घाम जास्त येत असतो.यासाठी दिवसभरात १२-१५ ग्लास पाणी अवश्य प्यावे.

* जर आपण रोज गरबा खेळत असाल तर .. आपल्या नेहमीच्या आहारात ३००-४०० कॅलरिज जास्त घ्याव्यात.

- Advertisement -

* सकाळी १०-११ दरम्यान ज्यामध्ये कॅलरिज जास्त असतात अशा फळांचा रस घ्यावा.

* दुपारच्या जेवणात २ चपात्या, भाजी,दही, सॅलड व एखादा गोड पदार्थ घ्यावा.

* संध्याकाळी मिल्क शेक, फळांचा ज्यूस किंवा शहाळ्याचे पाणी अवश्य प्यावे.

* उपवास असेल तर गरबा खेळायला जाण्याच्या २-३ तास आधी उकडलेल्या बटाट्याचा गोड शिरा. साबुदाणा       खिचडी, फळे असे उपवासाचे पदार्थ भरपेट खाऊन घ्यावेत, जेणेकरुन गरबा खेळताना तुमची एनर्जी कमी         पडणार नाही.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -