घरताज्या घडामोडीCruise Drug Case : समीर वानखेडेंच्या चौकशीचे NCB महासंचालकांचे आदेश

Cruise Drug Case : समीर वानखेडेंच्या चौकशीचे NCB महासंचालकांचे आदेश

Subscribe

दक्षता समिती मुंबईत चौकशीला येणार

आर्यन खान प्रकरणात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे विभागीय आयुक्त समीर वानखेडे यांच्याविरोधात विभागीय चौकशीचे मोठे संकेत मिळत आहे. याच प्रकरणात समीर वानखेडे हे दिल्लीत चौकशील हजर राहण्याची माहिती मिळत आहे. समीर वानखेडे यांच्यावर खंडणीच्या आरोपाच्या तक्रारी एनसीबीकडे दाखल झाल्या आहेत. त्यामुळेच विभागाकडून या प्रकरणात चौकशी होण्याचे संकेत आहेत. एनसीबीच्या अधिकाऱ्यांनीच याबाबतची स्पष्टोक्ती दिली आहे. त्यामुळेच समीर वानखेडे हे संपुर्ण प्रकरणात दिल्लीला आपली बाजू मांडण्यासाठी जाणार असल्याचे कळते. एनसीबीच्या विजिलन्स कमिटीकडून समीर वानखेडे यांनी विचारपूस होणार असल्याचे कळते. एनसीबीच्या महासंचालकांच्या आदेशावरूनच हे चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. तीन अधिकाऱ्यांची दक्षता समिती नेमण्यात आली असून ही समिती मुंबईत समीर वानखेडेंच्या चौकशीला येणार असल्याचे कळते.

- Advertisement -

समीर वानखेडेंवर आरोप काय ?

आर्यन खानला जामीन मिळवून देण्यासाठी शाहरूख खानची मॅनेजर पूजा ददलानी आणि सॅम डिसोझा यांच्यात २५ कोटींचा व्यवहार होणार होता. पण या प्रकरणात १८ कोटींवर व्यवहार संपुष्टात आल्याचे कळते. या प्रकरणात एनसीबीचा पंच किरण गोसावीचा ड्रायव्हर प्रभाकर साईलने या प्रकरणात पैशांचा व्यवहार झाल्याचा गौप्यस्फोट केला. या प्रकरणात १८ कोटींपैकी ८ कोटी रूपये हे समीर वानखेडेंना मिळणार होते, असा आरोप प्रभाकर साईलने केला होता. पण पंचांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्यानंतरच या प्रकरणात किरण गोसावी गायब झाला आहे. पण त्याच्या बॉडिगार्डच्या खुलाशामुळे आर्यन खान प्रकरणात मोठा ट्विस्ट निर्माण झाला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचा जन्मदाखला आणि जातीचे प्रमाणपत्र ट्विटरवर ट्विट करत मोठा आरोप केला आहे. खोट्या जातीच्या प्रमाणपत्राच्या आधारावरच समीर वानखेडे यांनी नोकरी मिळवल्याचा आरोप केला आहे.

- Advertisement -

 

काय म्हणाले एनसीबीचे अधिकारी ?

 

कोणत्या अधिकारी किंवा व्यक्तीबाबतची माहिती ही एनसीबीला देता येत नाही. पण एनसीबीकडे काही तक्रारी आल्या आहेत. त्याच आधारावर या प्रकरणात योग्य ती कारवाई होईल अशी माहिती एनसीबीचे अधिकारी ज्ञानेश्वर सिंह यांनी दिली. विविध ठिकाणाहून आलेल्या तक्रारीच्या आणि माहितीच्या आधारावरच आता एनसीबीच्या विजिलन्स कमिटीच्या माध्यमातून समीर वानखेडे यांची दिल्लीत चौकशी होणार आहे. वैयक्तिक साक्षीदारांनी काही प्रतिज्ञापत्रांच्या माध्यमातून काही गोष्टी सोशल मिडियावर मांडल्या आहेत. त्याच आधारावर एनसीबीचे महासंचालक यांनी सदर प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत, असे ज्ञानेश्वर सिंह म्हणाले. यापुढची चौकशी ही पुराव्यांच्या आधारावरच होईल असेही ते म्हणाले. समीर वानखेडे आपली बाजू मांडण्यासाठी दिल्लीला जाणार असल्याचे कळते. समीर वानखेडे यांच्यावर खंडणीचे आरोप झाल्याने या विजिलन्स कमिटीने समीर वानखेडे यांची चौकशी करण्याचे ठरविले आहे. तीन अधिकाऱ्यांची दक्षता समिती नेमण्यात आली असून ही समिती मुंबईत समीर वानखेडेंच्या चौकशीला येणार असल्याचे कळते. या प्रकरणात समीर वानखेडें यांच्याकडून क्रूझ ड्रग्ज प्रकरणातील तपास काढून घ्यायचा की नाही याबाबचाही निर्णय होणार असल्याचे कळते.


हेही वाचा – Cruise Drug Case: माझ्या कारकिर्दीत कधीही चुकीच वागलो नाही, तरीही कुटुंबिय लक्ष्य; वानखेडेंनी कोर्टात मांडली बाजू


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -