घरमहाराष्ट्रनाशिक‘परीक्षेतील गोंधळाची चौकशी करुन अहवाल देणार’

‘परीक्षेतील गोंधळाची चौकशी करुन अहवाल देणार’

Subscribe

केबीएच, केटीएचएम , सीएमसीएस या परीक्षा केंद्रावर उडाला गोंधळ

नाशिक :आरोग्य विभागाच्या वेगवेगळ्या ५४ पदांसाठी नाशिकमध्ये ४६ केंद्रांवर परीक्षा झाली. या केंद्रांवर सकाळी १० ते १२ आणि दुपारी ३ ते ५ वाजता परीक्षा झाली. गिरणारे येथील केबीएच महाविद्यालयात थोडीशी अडचण निर्माण झाली.ही संपूर्ण परीक्षा प्रक्रिया आरोग्य विभाग आणि न्यासा संस्था हाताळत आहे. न्यासा संस्थेवर पेपर पुरवणे, केंद्रांवर व्यवस्था पुरवण्याची जबाबदारी सोपविण्यात आली होती. मात्र, गिरणारे केंद्रावर पेपर वाटपात ५२८ विद्यार्थी असताना १९२ पेपर कमी दिले.ही बाब केंद्रप्रमुखांच्या अर्धा तास आधी लक्षात आली. त्यानंतर त्यांनी न्यासाच्या प्रतिनिधीशी संपर्क साधला.  तोपर्यंत न्यासाच्या प्रतिनिधींनी पेपर उपलब्ध करुन दिले होते.

जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसील,अपर पोलीस अधीक्षक आदी सर्वजण घटनास्थळी दाखल झाले.सर्वांनी विद्यार्थ्यांचा समजूत घालण्याचा प्रयत्न केला.काही विद्यार्थी वेळ वाढवून मिळावा, अशी मागणी करत होते. त्यानुसार १२ ते २ परीक्षा झाली. विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. काही विद्यार्थ्यांनी आरोप केला की, पेपर फुटलेला आहे. मात्र, पेपर फुटलेला नव्हता. एका स्टीलच्या बॉक्समध्ये आणखी एक पुष्ठ्याचा बॉक्स परत त्यात एका प्लॅस्टिकच्या रॅपरमध्ये सील केलेले पेपर केंद्रांवर पाठविण्यात आले होते. तिन्ही सील व्यवस्थित असल्याचे केंद्रप्रमुखांनी सांगितले आहे. तरीही, अधिक चौकशी केली जाईल. पेपर सुरळीत पार पडले आहेत. दुपारचा पेपरसुद्धा ३ ते ५ वाजता सुरळीत पार पडला. सकाळच्या सत्रात वेळ वाढवून दिली होती. जवळपास ५० टक्के विद्यार्थ्यांनी उपस्थिती लावली आहे. आरोग्य विभाग आणि न्यासाच्या लोकांमध्ये हातळणीत काही चूक झाली का,या बाबतचा अहवाल आरोग्य विभागाकडे सादर केला जाणार आहे,असे जिल्हाधिकार्‍यांनी सांगितले.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -