घरदिवाळी २०२१Festive Skin Care Tips: दिवाळीत पार्लरला जाणे टाळा अन् घरबसल्या चेहऱ्यावर आणा...

Festive Skin Care Tips: दिवाळीत पार्लरला जाणे टाळा अन् घरबसल्या चेहऱ्यावर आणा पार्लरचा ग्लो

Subscribe

दिवाळी हा सण भारतात मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. मात्र दिवाळीनिमित्त प्रत्येकालाच सुंदर आणि वेगळं दिसाव असं वाटते. विशेष म्हणजे महिला या सणांच्या दिवसात अधिक सुंदर दिसण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र दिवाळीचा फराळ, साफसफाई, सजावटीच्या गडबडीत महिलांना अनेकदा पार्लरमध्ये जाण्यास वेळ मिळत नाही. अशावेळी दिवाळीत पार्लरला न घरबसल्या चेहऱ्यावर पार्लरचा ग्लो आणू शकता. आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्याचा अवलंब करून तुम्ही या दिवाळीत सुंदर आणि अप्रतिम दिसू शकता. कसे ते जाणून घेऊया..

फॉलो करा ‘या’ टिप्स

1) कॉफी आणि लिंबू

लिंबूमध्ये ब्लीचिंग प्रॉपर्टीज अधिक असतात. ज्यामुळे चेहऱ्यावरील डेड सेल्स काढण्यासाठी मदत मिळू शकते. यासाठी लिंबूच्या पाण्यात थोडी कॉफी पावडर मिक्स करुन चेहऱ्यावर आणि हाता-पायांवर लावा, १० मिनिटे झाल्यानंतर चेहरा नॉर्मल पाण्याने साफ करा. यामुळे चेहऱ्यावर चमक येण्यास मदत होईल.

- Advertisement -

2) टॉमेटो

टॉमेटोच्या मशाजनेही तुम्ही चेहऱ्यावर एक सुंदर ग्लो आणू शकता. टॉमेटो हा त्वचेवर स्क्रबप्रमाणे काम करतो. यासाठी अर्धा टॉमेटो घेऊन तुम्ही तुमच्या त्वचेवर चेहऱ्यावर १० मिनिटे चांगल्या तऱ्हेने स्क्रब करा. आणि नंतर नॉर्मल पाण्याने चेहरा साफ करा.

३) हळद, बेसन आणि गुलाब पाणी

एक चमचा बेसनमध्ये एक चिमुट हळद पावडर टाका, मात्र हळद खूप जास्त घेऊ नका नाही तर चेहरा अधिक पिवळा दिसेल. या मिश्रणात गुलाब पाणी टाकून मिश्रण एक करा. यानंतर हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. यानंतर थोडं सुकल्यानंतर थोडं हाताने मशाज करा. थोड्यावेळाने नॉर्मल पाण्याने चेहरा धुवून टाका. ज्यामुळे चेहऱ्यावर डेड सेल्स आणि काळपटपणा जाईल.बेसन दह्याबरोबर मिक्स करा आणि ही पेस्ट चेहऱ्याला लावून मसाज करा. हे तेलकट आणि कॉम्बिनेशन त्वचेसाठी चांगलं ठरतं.

- Advertisement -

४) बर्फ 

बर्फाचे तुकडे घेऊन एका पॉलीबॅगच्या मदतीने चेहऱ्यावर १० मिनिटे मसाज करा. बर्फाने मसाज करुन चेहरा थोडा नॉर्मल झाल्यानंतर मॉईश्चरायजर क्रीम लावा.

५) कच्चे दूध

कच्चे दूध देखील चेहरा सुंदर दिसण्यासाठी मदत करते. कच्चे दुध नुसते चेहऱ्यावर लावून थोडं मसाज करा. १० मिनिटांनी चेहरा धुवून टाका. ज्यामुळे चेहरा अधिक मुलायम होण्यास मदत होईल.

नोट : चेहऱ्यासंबंधीत समस्या असलेल्या लोकांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारचं या टिप्स फॉलो करा.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -