घरदेश-विदेशDnyandev Wankhede : सर्व कागदपत्रांवर डी. वानखेडे नावाचाच उल्लेख, समीर वानखेडेंच्या वडिलांचा...

Dnyandev Wankhede : सर्व कागदपत्रांवर डी. वानखेडे नावाचाच उल्लेख, समीर वानखेडेंच्या वडिलांचा दावा

Subscribe

मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणी शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान तुरुगांत आहे. त्याच्या सुटकेसाठी आता शाहरुख खानकडून प्रयत्न सुरु आहेत. आजही त्याच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. मात्र या प्रकरणाला दररोज नवनवे वळण मिळत आहे. याप्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नबाव मलिक यांनी उडी घेत एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. यात समीर वानखेडे यांनी आपली धार्मिक ओळख लपवल सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. मात्र समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मलिकांचे सर्व आरोप फेटाळून लावत माझे नाव ज्ञानदेव वानखेडे असल्याचे स्पष्ट केले आहे.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्या वडीलांचे नाव दाऊद वानखेडे असल्याचा कागदपत्रे जाहीर केली होती. यावर ज्ञानदेव वानखेडे यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, माझी पत्नी मुस्लीम असल्याने ती मला दाऊद बोलत असेल, अनेकदा आपणही कोणाला दाऊद भाय कैसे हो? अशी हाक मारतो. असं कधी माझी पत्नी मला प्रेमाने बोलली असेल. घरात कोणलाही लाडाने मुन्ना किंवा काहीही नावाने हाक मारली जाते. तसचं कधीतरी पत्नी बोलली असेल. असा दावा ज्ञानदेव वानखेडे यांनी केला आहे.

- Advertisement -

“समीन वानखेडेंच्या कागदपत्रांवर समीर डी. वानखेडे असं मी थोडी लिहिलं आहे. माझ्या सर्व कागदेशीर कागदपत्रांवर आणि मी रिटायर्ड झालो त्या पेपरवरही डी. के. वानखेडे असचं लिहिले आहे. यावेळी ज्ञानदेव वानखेडे यांनी रिटायर्ड प्रमाणपत्र सादर केला ज्यावर ज्ञानदेव कचरुजी वानखेडे असं लिहिले असल्याचे दाखवले.

“याविरोधात मी न्यायालयात जाणार” 

“समीर वानखेडे यांचा निकाह नामा उर्दू भाषेत आहे आणि त्यावरील सही इंग्रजीत आहे. मात्र माझा मुलगा समीर वानखेडे याचा डॉ. शबाना कुरेशीसह निकाह झाला आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीसोबत पटत नव्हते त्यामुळे दोघांनी संघनमताने  कायदेशीर घटस्फोट घेतला. त्यामुळे असे प्रश्न उपस्थित झाले नाही पाहिजेत. हे त्यांचे वैयक्तिक आयुष्य आहे. त्यामुळे नवाब मलिक यांनी कोणाच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलले नाही पाहिजे. वैयक्तिक आयुष्य कुठे… मी कुठे … नवाब मलिक कुठे.. ही खूप चुकीची गोष्ट आहे. याविरोधात मी न्यायालयातही जाऊ शकतो.” असंही वानखेडे म्हणाले.

- Advertisement -

“समीरच्या आईने निकाहनाम्यावर सही केली” 

“मी सरकारी नोकरीत लागलो तर काही तरी कायदेशीर चौकशीनेच लागलो असेन ना. जेव्हा दोन वेगळ्या धर्माचे पतीप-पत्नीला घटस्फोट घ्यायच्या झाल्यास इस्लाम धर्मानुसार घटस्फोट घेता येत नाही. दोघं एका जातीचे असतील तरचं निकाह कबूल केला जात नाही. हिंदू आणि मुसलमानचा निकाह होऊ शकत नाही. परंतु माझ्या पत्नी प्रेमाने लिहिले असेल काही. मात्र खरी जन्मपत्रिका, सरकारी दस्तावेज, दाखला, नोकरीची कागदपत्र, खानदान सर्वांवर ज्ञानदेव वानखेडेंच असा उल्लेख आहे. निकाह एका पद्धतीने होतो. त्यावरील मोहर दिल्याचा उल्लेख असेल.. मला उर्दू समजत नाही त्यामुळे ते तिलाच माहित. समीरच्या आईने निकाहनाम्यावर सही आहे. यामध्ये काहीही गैर नाही,” असेही ज्ञानदेव वानखेडे म्हणाले.

“क्रांती समीरला लग्नाआधीही भेटत होती. तिला सर्व गोष्टी माहित आहे. मी शिवडी गर्व्हरमेंट कॉटर्समध्ये राहत होतो, याठिकाणी लग्नाआधी ती येत होती, त्यावेळी ती हॉस्पीटलमध्ये इंर्टनशीप करत होती. लोकं मला वानखेडे नावाने पहिल्यापासून ओळखतात.” असंही ज्ञानदेव वानखेडे म्हणाले.

“फेसबुकवर दाऊद वानखेडे नावाने बनावट अकाऊंट”

“फेसबुवर माझ्या फोटोचा वापर करुन दाऊन वानखेडे नावाने बनावट अकाऊंट तयार केले आहे. कोणी कोणाच्याही नावे बनावट अकाउंट तयार करु शकतो. असंही ज्ञानदेव वानखेडे म्हणाले. मात्र या प्रकरणाशी माझ्या धर्माचा, माझा नावाशी काय संबंध आहे? मला नवाब मलिकांनी सांगावे. असा सवाल त्यांनी उपस्थित केले,


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -