घरताज्या घडामोडीपालकांनो तुमच्या मुलांना मादक पदार्थांचे व्यसन लागले आहे का? कसे ओळखाल?

पालकांनो तुमच्या मुलांना मादक पदार्थांचे व्यसन लागले आहे का? कसे ओळखाल?

Subscribe

योग्‍य मार्गदर्शन मिळाले नाही तर मुलांवर त्‍यांचे सहकारी मित्र व आसपासच्‍या वातावरणाचा प्रचंड प्रभाव पडू शकतो

सध्या सुरू असलेल्या आर्यन खान ड्रग्ज प्रकरणामुळे तरुण पिढी मादक किंवा अमली पदार्थांना बळी पडत असल्याचे समोर येत आहे. बऱ्याच वेळा दोन्ही पालक नोकरीसाठी दिवसभर घराबाहेर असल्यानं मुले काय करतात याबद्दल त्यांना माहित नसते. जेव्हा मुलगा व्यसनाच्या पूर्ण आहारी जातो त्यावेळी मात्र मुलाचे काहीतरी बिनसत असल्याचे त्यांच्या लक्षात येते. यात मुलाला व्यसनाधीनतेतून बाहेर काढण्यात पालकांना यश मिळते तर काही वेळा बराच उशीर झालेला असतो. याचविषयी फोर्टीस रुग्णालयाचे मानसोपचार तज्ञ डॉ. केदार तिळवे यांनी खास पालकांसाठी लिहिलेला हा लेख.

पालकांचे त्‍यांच्‍या मुलांच्‍या जीवनाला आकार देण्‍यामध्‍ये मोठे योगदान असते. पण, योग्‍य मार्गदर्शन मिळाले नाही तर मुलांवर त्‍यांचे सहकारी मित्र व आसपासच्‍या वातावरणाचा प्रचंड प्रभाव पडू शकतो आणि ते जीवनाच्‍या सुरूवातीच्‍या टप्‍प्‍यामध्‍ये मादक पदार्थांचे व्‍यसन यासारखे चुकीचे निर्णय घेऊ शकतात, जे खूपच घातक आहे. अनेकजण उत्‍सुकता, सहका-यांचा दबाव आणि मनोरंजनाच्‍या उद्देशाने मादक पदार्थांचे सेवन सुरू करतात. तसेच दादागिरी, दुर्लक्ष, अस्‍वस्‍थ कौटुंबिक वातावारण, वास्‍तविकतेपासून दूर राहण्‍याची गरज अशा काही बाह्य घटकांमुळे देखील मादक पदार्थांचे व्‍यसन लागू शकते. कारण काही असो, मादक पदार्थांचे सेवन वेळेवर नियंत्रित केले नाही किंवा थांबवले नाही तर शारीरिक व मानसिक आरोग्‍यासाठी अत्‍यंत घातक ठरू शकते.

- Advertisement -

तुमच्‍या मुलांना मादक पदार्थांचे व्‍यसन लागले आहे याबाबत सांगू शकणारी अशी कोणतीही वैश्विक लक्षणे नाहीत.
पण, मुलांमध्‍ये दिसून येतील अशी काही विशिष्‍ट शारीरिक लक्षणे आहेत.

  •  डोळे लालसर दिसणे
  •  झोप येण्‍यास अडथळा होणे
  •  त्‍वचा लालसर होणे
  • अचानक वजन कमी होणे किंवा जेवत नसताना देखील वजन वाढणे, किंवा खूप भूक लागणे
  • बोलताना अडखळणे किंवा समन्‍वय न राखणे
  • अस्‍पष्‍ट जखमा, जसे पंक्‍चरप्रमाणे जखमेच्या खुणा किंवा त्‍वचेवर डाग दिसणे
  • त्‍यांचा श्‍वास, कपड्यांमधून वेगळाच वास येणे
  • थकवा
  • प्रखर प्रकाशात डोळ्यांना त्रास होणे
  • अंधुक प्रकाशात देखील डोळ्यांना त्रास होणे
  • मादक पदार्थ मिळाले नाही तर व्‍यक्‍ती उदासीन होते, चिडचिडपणा करते, घाम येतो आणि अतीव प्रकरणांमध्‍ये त्‍यांना झटके देखील येऊ शकतात.
  • वर्तणूकीमधील काही बदल पुढीलप्रमाणे असू शकतात:
  • अवधान, रूचीचा अभाव आणि लक्ष केंद्रित करण्‍यामध्‍ये असक्षम
  • सुस्‍ती, स्‍वत:ची स्‍वच्‍छता / दिसण्‍याकडे लक्ष न देणे
  • नैराश्‍य, चिंता
  • इतरांपासून स्‍वत: वेगळे राहणे
  • मतिभ्रम
  • सतत मूड बदलत राहणे
  • कमी आत्‍मविश्‍वास
  • आक्रमक वृत्ती
  • लालसा
  • स्‍वत:चा नाश करण्‍याची किंवा स्‍वत:ला दुखापत करण्‍याची वृत्ती
  • सतत खोटे बोलणे किंवा चोरी करणे
  • झोपेच्‍या चक्रामध्‍ये बदल किंवा रात्री अधिककरून घराबाहेरच राहणे
  • अचानक शैक्षणिक कामगिरी खालावणे किंवा क्‍लासला दांडी मारणे

मादक पदार्थांच्‍या व्‍यसनापासून दूर ठेवण्‍यासाठी पालक त्‍यांच्‍या मुलांना कशाप्रकारे मदत करू शकतात? तुम्‍ही स्थिती काळजीपूर्वक हाताळणे गरजेचे आहे. तुम्‍हाला तुमच्‍या मुलाला मादक पदार्थांचे व्यसन लागले असल्‍याचे समजल्‍यानंतर प्रतिसाद द्या आणि प्रतिक्रिया देऊ नका. प्रखर व रागीट प्रतिक्रियेमुळे स्थिती सुरळीत होण्‍यापेक्षा अधिक बिकट होईल. ही वेळ संयमी राहण्‍याची असते.

- Advertisement -
  • तुमच्‍या मुलाचे संपूर्ण मत ऐकण्‍याचा प्रयत्‍न करा; दोघांसाठी हा संवाद अस्‍वस्‍थ करणारा असू शकतो, पण संवाद साधणे आवश्‍यक आहे.
  • समर्थन व दयाळूपणा दाखवा. तुमच्‍या मुलांना कळू द्या की, त्‍यांना तुमचा आधार आहे आणि त्‍यांना सोडून देणार नाही, मुलांसाठी सुरक्षा कवच बना.
  • तुमच्‍या मुलाला व्‍यावसायिक समुपदेशनाची गरज भासू शकते; हे समुपदेशन बाहेर जाऊन करता येऊ शकते किंवा घरामध्‍येच उपचार करता येऊ शकतो. उपचारामध्‍ये सामील होण्‍याची खात्री घ्‍या. तुमच्‍या मुलाची स्थिती उत्तम होण्‍यासाठी सकारात्‍मक पालक आधार महत्त्वाचा आहे.

    हेही वाचा – हवेतील प्रदूषण आणि हॉर्नच्या गोंगाटामुळे हार्ट अटॅकचा धोका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -