घरदेश-विदेशTaliban bans foreign currencies : तालिबानकडून विदेशी चलनावर पूर्णपणे बंदी, नियम मोडल्य़ास...

Taliban bans foreign currencies : तालिबानकडून विदेशी चलनावर पूर्णपणे बंदी, नियम मोडल्य़ास होतेय…

Subscribe

तालिबानने अफगाणिस्तावर ताबा मिळवताच याचे दूरगामी परिणाम अनेक घटकांवर दिसून येत आहेत. या देशात सध्या अनागोंदी माजली असून जनतेला अन्नाविना दिवस काढावे लागतायत. यामुळे अफगाणिस्तानमध्य़े भूकबळी मोठ्याप्रमाणात वाढतेय. आधीच कोलमडलेल्या आर्थिक स्थितीत आता तालिबानने अफगाणिस्तानमध्ये विदेशी चलनाच्या वापरावर पूर्णपणे बंदी घातली आहे. तालिबानने म्हटले आहे की, देशातील आर्थिक परिस्थिती पाहता सर्व लोकांनी राष्ट्रहितासाठी केवळ अफगाण चलन वापरावे. हा निर्णय अशावेळी घेण्यात आला आहे जेव्हा अफगाणिस्तान रोख रकमेची कमतरता आणि उपासमारीच्या मार्गावर आहे.

तालिबान सरकारच्या नव्या विदेशी चलन वापरावरील बंदीच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर कारवाई केली जाणार आहे. एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार, तालिबान सरकारने एक निवेदन जाहीर केले आहे. ज्यात तालिबानमधील सर्व नागरिक, दुकानदार, व्यापाऱ्यांनी सर्व व्यवहार अफगाणी भाषेत करावे, तसेच विदेशी चलन वापरापासून दूर रहा असे आवाहन करण्यात आले आहे. कोणीही या आदेशाचे उल्लंघन केल्यास त्याव्यक्तीविरोधात कायदेशीर कारवाई केली जाईल. असं म्हटले आहे. सध्या तालिबानमध्ये मोठ्या प्रमाणात अमेरिकन डॉलरचा वापर केला जातो, तर सीमावर्ती भागात पाकिस्तानी चलनही चलनात आहे.

- Advertisement -

१५ ऑगस्ट रोजी तालिबानने काबूलवर ताबा घेतल्यानंतर अमेरिकेतील जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने अफगाणिस्तानची आंतरराष्ट्रीय मदत थांबली आहे. या परिस्थितीत तालिबान आंतरराष्ट्रीय समर्थन मिळविण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु अद्यापही कोणत्याही देशाकडून अफगाणिस्तानातील तालिबान सरकारला औपचारिक समर्थन मिळाले नाही. याचबरोबर तालिबानच्या ताब्यानंतर अफगाणिस्तानातील इतर देशांची संपत्तीही जप्त करण्यात आली आहे. त्यामुळे तालिबानसमोर मोठं आर्थिक संकट उभं राहिलं आहे.

आत्तापर्यंत लाखो अफगाणी नागरिकांनी देश सोडला आहे. कोणतीही आंतरराष्ट्रीय मदत आणि संबंध नसलेल्या या देशातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होतेय. नागरिकांना दोन वेळचं खाणं मिळण अवघड झालेय. परिणामी सर्वसामान्य लोकांसाठी ही परिस्थिती अधिकच कठीण होत जातेय.

- Advertisement -

अफगाणिस्तानमध्ये तालिबान राजवट सुरू झाल्यापासून इस्लामिक स्टेटचे हल्ले वाढले आहेत. तालिबानने काबूल ताब्यात घेतल्यापासून अफगाणिस्तानात स्फोटांची मालिका सुरू आहे. यामध्ये शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. या सर्व स्फोटांची जबाबदारी इस्लामिक स्टेट (ISIS) या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. याच क्रमाने राजधानी काबूलमध्ये नवा हल्ला झाला. या भीषण बॉम्बस्फोटात  २५ जणांचा मृत्यू झाला होता तर ५० हून अधिक जण जखमी झाले होते. इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेनेही याची जबाबदारी स्वीकारली आहे.


 

 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -