घरताज्या घडामोडीUran : मरणाच्या दारात असणार्‍या जन्मदात्या पित्याला यकृत देऊन लेकीनं वाचविले प्राण

Uran : मरणाच्या दारात असणार्‍या जन्मदात्या पित्याला यकृत देऊन लेकीनं वाचविले प्राण

Subscribe

आजच्या युगात जमिनीचा हिस्सा मागणार्‍या मुली आपण नेहमीच पाहत असतो. पण मरणाच्या दारात असणार्‍या जन्मदात्याचे प्राण वाचविण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालणार्‍या मुली खूप कमी बघायला मिळतात. अशीच एक मुलगी तालुक्यातील चिरनेर गावात असून, अक्षता पंकज पाटील ऊर्फ गॅबी असे तिचे नाव! तिने पित्याला मरणाच्या दारातून बाहेर काढण्यासाठी चक्क स्वतःचे यकृत देत समाजापुढे आदर्श निर्माण केला आहे.

रायगड जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा उरण पंचायत समितीचे माजी उपसभापती कै.काळूशेठ खारपाटील यांचे कनिष्ठ चिरंजीव प्रशांत खारपाटील (४५) यांना कोरोनाच्या संकटात लिव्हर सिरॉसिन हा आजार जडला. त्यांना यकृत प्रत्यारोपणाची गरज असल्याची माहिती नवी मुंबई येथील अपोलो रुग्णालयातील डॉक्टरांनी त्यांच्या कुटुंबियांना सहा महिन्यांपूर्वी दिली. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खारपाटील कुटुंबियांचा आधारस्तंभ असणार्‍या प्रशांत यांचे प्राण कोण वाचविणार, अशा त्यांच्या कुटुंबियांसमोर उभा राहिला.

- Advertisement -

आपला जन्मदाता आता कायमचा सोडून जाणार असा विचार करून प्रशांत खारपाटील यांची ज्येष्ठ कन्या अक्षता हिने आपले यकृत देण्याची इच्छा कुटुंबियांसमोर, तसेच डॉक्टरांजवळ व्यक्त केली. यावेळी अक्षताचे मनोबल वाढविण्यासाठी आणि आपल्या सासर्‍याचे प्राण वाचविण्यासाठी अक्षताचे पती पंकज प्रेमनाथ पाटील यांनी तू तुझ्या जन्मदात्या पित्याला बिनधास्तपणे तुझे यकृत दे, मी तुझ्या मागे खंबीरपणे उभा असल्याचा विश्वास दिला. अक्षताने देऊ केलेल्या यकृतामुळे परळ येथील ग्लोबल रुग्णालयातील डॉ. रवी मोहंका आणि त्यांच्या टीमच्या १२ तासांच्या अथक प्रयत्नाने प्रशांत यांच्यावर नुकतीच यशस्वीरित्या शस्त्रक्रिया पार पडली.

आज प्रशांत आणि अक्षता सुखरूप आपल्या घरी परतले आहेत. त्यामुळे अक्षतासारखी कन्या आणि पंकजसारखा जावई सर्वांना मिळावा, अशी प्रार्थना मरणाच्या दारातून बाहेर आलेल्या प्रशांत यांनी महागणपती चरणी व्यक्त केली. ग्लोबलच्या डॉक्टरांनीही अक्षता हिच्या धाडसाचे कौतुक केले आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – ST Workers Strike : आपल्या ST ला ‘वृद्धाश्रमात’ पाठवलं जातंय, चित्रा वाघ यांची परिवहन मंत्र्यांवर आगपाखड


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -