घरताज्या घडामोडीPadma Awards 2020: वरचा मजला रिकामा असलेल्या कंगनाचा पद्मश्री पुरस्कार रद्द करावा...

Padma Awards 2020: वरचा मजला रिकामा असलेल्या कंगनाचा पद्मश्री पुरस्कार रद्द करावा – नीलम गोऱ्हे

Subscribe

बॉलिवूडची कॉन्ट्रोवर्सी क्विन कंगना रणौत नेहमी आपल्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वी ‘मणिकर्णिका’ आणि ‘पंगा’ या चित्रपटांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काने तिला गौरविण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते कंगनावा पद्मश्री पुरस्कार देण्यात आला. मात्र आता तिने केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे तिचा पद्मश्री पुरस्कार रद्द करण्याची मागणी शिवसेनेच्या उपनेत्या नीलम गोऱ्हे यांनी राष्ट्रपतींकडे केली आहे.

नीलम गोऱ्हे यांनी ट्वीट करून कंगनाने देशातील स्वातंत्र्यासंबंधित केलेल्या वक्तव्याचा निषेध केला. त्या म्हणाल्या की, ‘राष्ट्रपतींनी कंगना रणौतला नुकताच पद्मश्री पुरस्कार प्रदान केला. त्याच्या नंतर अत्यंत बेजाबाबदार, निराधार आणि स्वातंत्र्य यौद्धांचे अपमान करणार विधान कंगना रणौतने केले आहे. मी याचा मनापासून निषेध करते. प्रसिद्धसाठी वरचा माजला रिकामा असलेली आणि बेताल विधान करणारी अभिनेत्री कंगना रणौतने तिच्या विधानामधून ज्या १९४७मधल्या स्वातंत्र्य योद्धांनी स्वतःचे जीवन समर्पित केले त्यांचा अपमान केला आहे. तसेच त्या लढ्याचा अपमान केलेला आहे. त्याच्यामुळे कंगनाचा पुरस्कार ताबडतोब रद्द करण्यात यावा. तिच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशा प्रकारची विनंती मी राष्ट्रपतींना करत आहे.’

- Advertisement -

नक्की कंगना काय म्हणाली?

कंगना एका मुलाखती दरम्यान म्हणाली की, ‘देशात काँग्रेसची सत्ता होती तेव्हा मला दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला होता. मी जेव्हा राष्ट्रवादावर भाष्य करते, सैन्याबद्दल बोलते देशाची संस्कृती प्रमोट करते तेव्हा मी भाजपचा अजेंडा चालवते असे म्हटले जाते. हा भाजपचा अजेंडा आहे असे का म्हटले जाते हा देशाचा अजेंडा आहे. देशाला १९४७ साली स्वातंत्र मिळाले असे आपण म्हणतो. परंतु तेव्हा मिळालेले स्वातंत्र ही भीक होती. देशाला खरे स्वातंत्र २०१४मध्ये मिळाले.’

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -