घरमहाराष्ट्रमूकबधीर महिलेचा ४ जवानांवर बलात्काराचा आरोप

मूकबधीर महिलेचा ४ जवानांवर बलात्काराचा आरोप

Subscribe

मागील चार वर्षांमध्ये या मूक-बधिर महिलेवर अनेकदा बलात्कार झाल्याचे तिने एफआयआरमध्ये म्हटले आहे.

महिलांवर होणारे अत्याचार दिवसागणिक वाढतानाच दिसत आहेत. महिलांना स्वत:ची खासगी मालमत्ता समजून त्यांचे शोषण करणारे अनेक लोक आज समाजात खुलेपणाने वावरत आहेत. महिलांच्या सुरक्षेसंदर्भात कायद्यामध्ये अनेक तरतूदी देखील करण्यात आल्या आहेत. मात्र, अनेक लोक कायद्यांचं उल्लंघन करत सर्रासपणे महिलांचं शोषण करतात. एकीकडे महिलांवरील बलात्काराच्या घटना समोर येत असताना, दुसरीकडे एका मूकबधिर महिलेने लष्कराच्या ४ जवानांवर बलात्काराचा आरोप केला आहे. पीडित महिलेने तिची तक्रार लेखी पत्राच्या स्वरुपात संरक्षण मंत्री आणि लष्कर प्रमुखांना पाठवली आहे. याप्रकरणी पुण्यातील खडकी इथल्या लष्करी रुग्णालयात तैनात असलेल्या चारही जवानांवर विनयभंग आणि बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सूत्रांनुसार, खरंतर ही बात्काराची घटना २०१५ साली घडली होती. मात्र, आजपर्यंत हे प्रकरण प्रलंबित होते.


वाचा: ‘ही’ जीन्स घाला आणि पोटातला गॅस बिनधास्त सोडा!

एका स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने पीडित महिलेने तिच्यावर झालेल्या अन्यायासंबंधी इंदूरमध्ये तक्रार दाखल केली. पीडित महिला विधवा असून तिला एक मुलगा आहे. चार वर्षात या महिलेवर अनेकदा बलात्कार झाल्याचे तिने एफआयआरमध्ये म्हटले आहे. दरम्यान याप्रकरणी माध्यमांशी बोलताना पुण्याचे एसीपी कल्याणराव विधाते म्हणाले, ‘आरोप लावण्यात आलेले चारही जवान आणि पीडित महिला एकाच ठिकाणी रात्रपळीला काम करत होते. पीडिता मूकबधिर असल्यामुळे तिच्या असहायतेचा फायदा घेत त्या चौघांनी तिचं लैंगिक शोषण केलं. याची फिर्याद त्या महिलेने लेखी स्वरुपात केली.’ उपलब्ध माहितीनुसार, याआधीही अनेकदा लष्करामध्ये अशाप्रकारच्या घटना घडल्या आहेत.


वाचा: राज्य मंत्रिमंडळाचा दिवाळीपर्यंत विस्तार – मुख्यमंत्री फडणवीस

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -