घरक्रीडाFootball : कर्णधार हॅरी केनची हॅट्रिक; इंग्लंडने पात्रता फेरीत अल्बेनियाचा केला पराभव

Football : कर्णधार हॅरी केनची हॅट्रिक; इंग्लंडने पात्रता फेरीत अल्बेनियाचा केला पराभव

Subscribe

कर्णधार हॅरी केनच्या हॅट्रिकच्या बदल्यात इंग्लंडने अल्बेनियाचा ५-० अशा मोठ्या फरकाने पराभव केला आहे

कर्णधार हॅरी केनच्या हॅट्रिकच्या बदल्यात इंग्लंडने अल्बेनियाचा ५-० अशा मोठ्या फरकाने पराभव केला आहे. सोबतच पुढील वर्षी कतार येथे होणाऱ्या विश्वचषकासाठी आपले स्थान जवळपास निश्चित केले. पुढच्या वर्षी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी आपले तिकिट पक्के करण्यासाठी इंग्लंडचा सोमवारी क्रमवारीत त्यांच्यापेक्षा खालच्या पातळीवर असलेल्या सॅन मारिनोविरुद्ध सामना होणार आहे. त्या सामन्यात इंग्लंडला फक्त बरोबरीची खेळी करून सामना ड्रॉ करण्याची गरज आहे. तर इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनने अल्बेनियाविरूध्द केलेल्या हॅट्रिमुळे त्याला एक नवा विक्रम करण्याची संधी असणार आहे.

रूनीच्या विक्रमापासून ९ गोल दूर

इंग्लंडचा कर्णधार हॅरी केनने इंग्लंसाठी खेळताना ४४ गोल केले आहेत. सोबतच त्याने जिमी ग्रीव्हजची बरोबरी केली आहे आणि वेन रूनीच्या राष्ट्रीय विक्रमापासून फक्त ९ गोल दूर आहे. रूनीने इंग्लंडसाठी खेळताना एकूण ५३ गोल केले आहेत. बॉबी चाल्टर्न ४९ गोल करून दुसऱ्या तर लिनेकर ४८ गोलांसह तिसऱ्या स्थानावर आहे. हॅरीने या हंगामात टॉटनहम हॉटस्पर फुटबॉल क्लबसाठी फारशी चांगली कामगिरी केली नाही.

- Advertisement -

इंग्ंलडने पहिल्या सत्रातच ५ गोल केले होते. इंग्लंडला हॅरी मॅग्वायरने नवव्या मिनिटांत आघाडी मिळवून दिली. तर हेंडरसनने २८ व्या मिनिटात स्कोर २-० असा केला होता. हॅरीने १८ व्या आणि ३३ व्या मिनिटात गोल केले आणि ४५+१ मिनिटात आपली हॅट्रिक पूर्ण केली.


हे ही वाचा : Khel Ratna Award 2021: नीरज चोप्रासह १२ खेळाडूंना मिळणार मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार

- Advertisement -

 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -