घरदेश-विदेशकेंद्र सरकार ED आणि CBI च्या प्रमुखांचा कार्यकाळ ५ वर्षांपर्यंत वाढवणार

केंद्र सरकार ED आणि CBI च्या प्रमुखांचा कार्यकाळ ५ वर्षांपर्यंत वाढवणार

Subscribe

केंद्र सरकारने ईडी आणि सीबीआयच्या प्रमुखांचा कार्यकाळ ५ वर्षांपर्यंत वाढवण्यासाठी अध्यादेश आणला आहे.

केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) आणि अंमलबजावणी संचालनालय (ED) च्या प्रमुखांचा कार्यकाळ आता पाचवर्षापर्यंत असण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने रविवारी दोन्ही संस्थांच्या प्रमुखांचा कार्यकाळ वाढवण्यासाठी संबंधित कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी अध्यादेश काढला आहे. त्यामुळे आता ED आणि CBI च्या प्रमुखांचा कार्यकाळ ५ वर्षांपर्यंत वाढू शकतो.

सध्या ईडी आणि सीबीआयच्या प्रमुखांचा कार्यकाळ दोन वर्षांचा आहे. सीबीआयचे प्रमुख सुबोध जैस्वाल आणि ईडीचे प्रमुख संजय कुमार मिश्रा आहेत. नव्या अध्यादेशानुसार सीबीआय आणि ईडी प्रमुखांची नियुक्ती पहिल्या दोन वर्षांसाठी केली जाणार आहे. यानंतर, तीन वर्षांसाठी (१+१+१) मुदतवाढ दिली जाईल. पूर्ण पाचवर्ष ते त्या पदावर राहू शकत नाहीत.

- Advertisement -

२०१८ मध्ये जारी करण्यात आलेल्या नियुक्ती आदेशात नोव्हेंबर २०२० मध्ये बदल करत केंद्र सरकारने ईडीचे संचालक संजय कुमार मिश्रा यांचा कार्यकाळ एक वर्षाने वाढवला होता. संजय कुमार मिश्रा यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ नोव्हेंबर २०२० मध्ये संपला होता परंतु त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती.

- Advertisement -

तर, १९९७ पूर्वी सीबीआय संचालकांचा कार्यकाळ निश्चित नव्हता. सरकार त्यांची कधीही बदली करू शकत होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने विनीत नारायण यांच्या निकालात सीबीआय संचालकांना स्वतंत्रपणे काम करण्याची परवानगी देण्यासाठी किमान दोन वर्षांचा कार्यकाळ निश्चित केला होता.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -