घरताज्या घडामोडीकाळाची झडप: दोन सख्ख्या भावंडांचा दुर्दैवी मृत्यू

काळाची झडप: दोन सख्ख्या भावंडांचा दुर्दैवी मृत्यू

Subscribe

घरच्याच शेततळ्यात बुडून झाला मृत्यू, शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार

चांदवड – तालुक्यातील पाटे गावातल्या दोन सख्ख्या भावंडांचा घरच्याच शेततळ्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी (दि. १७) दुपारी घडली. या घटनेमुळे संपूर्ण कुटुंब प्रचंड धक्क्यात असून, गावावर शोककळा पसरलीय.

पाटे येथील शेतकरी संजय किसन तळेकर यांचा मोठा मुलगा ओम संजय तळेकर (वय १३) व साहिल संजय तळेकर (वय ११) हे दोघे सख्खे भाऊ शेताशेजारील नाल्यालगत बकऱ्या चारण्यासाठी गेलेले होते. याचदरम्यान त्यांचा शेततळ्यातील पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही घटना समजताच तळेकर कुटुंबाला प्रचंड धक्का बसला. या घटनेबाबत पोलीस पाटील मच्छिंद्र कासव यांनी चांदवड पोलिसांना माहिती दिली. उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाल्यानंतर रात्री शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. आई-वडिलांना ही दोनच मुलं होती. आता तळेकर कुटुंब पोरकं झाल्याने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होतेय.

Prashant Suryawanshi
Prashant Suryawanshihttps://www.mymahanagar.com/author/sprashant/
गेल्या १६ वर्षांपासून नाशिकमध्ये प्रिंट आणि डिजिटल मीडियात काम. तंत्रज्ञानातील बदल, पर्यावरण, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर विपुल लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -