घरटेक-वेककॉल-ड्रॉप समस्येतून मुक्ती हवेय? लवकर करा iphone अपडेट

कॉल-ड्रॉप समस्येतून मुक्ती हवेय? लवकर करा iphone अपडेट

Subscribe

ॲपलने iPhone 12 आणि iPhone 13 सीरिजसाठी आपल्या ऑपरेटिंग सिस्टमचा नवा अपडेट जारी केला आहे. या अपडेटचे नाव iOS 15.1.1 आहे. कंपनीने आपल्या रिलीज नोटमध्ये म्हटले आहे की, या नव्या अपडेटमुळे आयफोन १२ (iPhone 12) आणि आयफोन १३ (iPhone 13) सीरिजमधील कॉल-ड्रॉपची समस्या दूर होईल. हे अपडेट iPhone 13, iPhone 13 mini, iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max, iPhone 12, iPhone 12 mini, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max या मॉडेल्सला मिळाले आहे. ॲपलने आपल्या सपोर्ट पेजमध्ये म्हटले की, इतर आयफोन मॉडेल्स या अपडेटसाठी योग्य नाही आहे.

हा एक छोटा अपडेट आहे. याचा विशेष वापर आयफोन १२ आणि आयफोन १२ सीरिजमध्ये कॉलिंग पर्फोर्मेंस चांगले बनवण्यासाठी केले जाईल. iOS 15.1.1 अपडेट एक ओव्हर द एअर (OTA) अपडेट आहे. आयफोनच्या या अपडेटची साईज फक्त १.४४ MB आहे. कंपनीने हे अपडेट Wi-Fi द्वारे डाऊनलोड आणि इन्स्टॉल करण्याचा सल्ला दिला आहे. तसेच अपडेटपूर्वी डेटा बॅकअप जरूर घेण्यास सांगितले आहे. अपडेटसाठी तुम्हाला Settings > General > Software Update यावर जावे लागले त्यानंतर ‘Download and Install’ वर क्लिक करावे लागले.

- Advertisement -

या अपडेट व्यतिरिक्त ॲपल आपल्या पुढील अपडेट iOS 15.2वर काम करत आहे. हे अपडेट लवकरच सर्व स्मार्टफोनसाठी मिळेल. iOS 15.2चा तिसरा बीटा टेस्टिंगसाठी डेव्हलपर्सला दिला गेला आहे. या अपडेटच्या मदतीने युजर ॲपल म्युझिकची प्लेलिस्ट आतमध्येच सर्च करू शकतील. याशिवाय कॅमेराच्या सेटिंगमध्ये मॅक्रो कंट्रोल टॉगल दिला गेला आहे.


हेही वाचा – फ्री WIFI वापरताय? सावधान! खाजगी डेटावर हॅकर्सचा डल्ला, संशोधन अहवाल

- Advertisement -

 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -