घरक्रीडाIPL 2022 Retention :महागड्या खेळाडूंच्या यादीत या खेळाडूंनी विराटला टाकलं मागे

IPL 2022 Retention :महागड्या खेळाडूंच्या यादीत या खेळाडूंनी विराटला टाकलं मागे

Subscribe

इंडियन प्रीमियर लीगच्या २०२२ च्या हंगामासाठी खेळाडूंची रिटेन प्रक्रिया पार पडली आहे

इंडियन प्रीमियर लीगच्या २०२२ च्या हंगामासाठी खेळाडूंची रिटेन प्रक्रिया पार पडली आहे. कोणत्या संघाने कोणत्या खेळाडूला रिटेन केले आहे याची अंतिम यादी सादर करण्यात आली आहे. लक्षणीय बाब म्हणजे या यादीत काही मोठे बदल झाले आहेत. दरवेळी प्रमाणे काही खेळाडूंचे नुकसान झाले आहे तर काही खेळाडूंचे नशीब चमकले आहे. म्हणजेच काही खेळाडूंच्या वेतनात कपात झाली आहे. तर विराट कोहली सोबतच अन्य काही बड्या खेळाडूंच्या वेतनात कपात झाली असून ते त्यांच्या जुन्याच संघाचा हिस्सा राहिले आहेत.

रिटेंशन नंतर सर्वाधिक वेतन घेण्याच्या यादीत मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा, दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंत आणि रवींद्र जडेजा यांनी मुसंडी मारली आहे. या तीनही खेळाडूंना प्रत्येकी १६ कोटी मिळणार आहेत. तर पंत आणि रोहितला मागच्या हंगामात १५-१५ कोटी मिळत होते तर जडेजाला ७ कोटी मिळाले होते.

- Advertisement -

तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा माजी कर्णधार विराट कोहली आणि गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार एम.एस धोनीचे नुकसान झाले आहे. कोहली मागच्या हंगामात सर्वाधिक वेतन घेणारा खेळाडू ठरला होता. आरसीबीच्या फ्रँचायझीकडून त्याला १७ कोटी देण्यात आले होते. मात्र २०२२ च्या हंगामासाठी संघाकडून त्याला कायम जरूर ठेवण्यात आले पण त्याच्या वेतनात कपात झाली आहे. त्यामुळे त्याला आता बीसीसीआयच्या नियमानुसार १५ कोटी मिळतील. तर धोनीला सीएसकेच्या संघाकडून १२ कोटी मिळणार आहेत.

सर्वाधिक महागडे खेळाडू

मुंबई इंडियन्स – रोहित शर्मा (१६) कोटी
दिल्ली कॅपिटल्स – रिषभ पंत (१६) कोटी
चेन्नई सुपर किंग्स – रवींद्र जडेजा (१६) कोटी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू – विराट कोहली (१५) कोटी
सनरायझर्स हैदराबाद – केन विलियमसन (१४) कोटी
चेन्नई सुपर किंग्स – एम.एस धोनी (१२) कोटी
मुंबई इंडियन्स – जसप्रीत बुमराह (१२) कोटी
किंग्स इलेव्हन पंजाब- मयंक अग्रवाल (१२) कोटी
कोलकाता नाईट रायडर्स- आंद्रे रसेल (१२) कोटी
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू- ग्लेन मॅक्सवेल (११) कोटी

- Advertisement -

हे ही वाचा: http://IPL 2022 : धोनीचं नाव नसलं तरी…,खेळाडूंना रिटेन करण्याबाबत गौतम गंभीरचा धोनीवर निशाणा


 

MYMAHANAGAR
MYMAHANAGARhttps://www.mymahanagar.com/author/omkar/
ओमकार संकपाळ हे माय महानगर डॉट कॉमसाठी इंटर्नशीप करत असून, क्रीडा विषयात लिखाण करत आहेत.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -