घरटेक-वेकरोबोटचा चेहरा बना, दिड कोटी रुपये कमवा - 'या' कंपनीची भन्नाट...

रोबोटचा चेहरा बना, दिड कोटी रुपये कमवा – ‘या’ कंपनीची भन्नाट ऑफर

Subscribe

अमेरिकन टेक कंपनी ‘प्रोमोबोट’ ह्युमनॉइड रोबोट म्हणजेच मानवी रोबोट असिस्टंटसाठी एक मानवी चेहरा शोधत आहेत. हे नवीन रोबोट हॉटेल्स,शॉपिंग मॉल्स आणि इतर गर्दीच्या ठिकाणी काम करतील.यासाठी अमेरिकन टेक कंपनी $२००,००० (सुमारे १.५ कोटी रुपये) देण्यात येणार आहे. मात्र ही रक्कम फक्त कंपनीला आपला चेहरा मानवी रोबोटच्या निर्मितीसाठी वापरण्याची परवानगी देणाऱ्यांनाच मिळणार आहे. ‘प्रोमोबोट’ ही अमेरिकन कंपनी रोबोट बनवण्यासाठी ओळखली जाते. कंपनी या रोबोटसाठी ज्याच्या चेहऱ्यावर आपुलकी,मैत्रीभाव दिसून येतात अशा चेहऱ्याच्या शोधात असल्याचे ‘प्रोमोबोट’ कंपनीने जाहीर केले आहे. प्रोमोबोट कंपनीने त्यांच्या वेबसाईडवर नमूद केले आहे की, त्यांची कंपनी फेशियल रेकग्निशन क्षेत्रात काम करत आहे. याशिवाय, कंपनी स्पीच, ऑटोनॉमस नेव्हिगेशन, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्सच्या इतर क्षेत्रात काम करते.

कंपनी २०१९ पासून बाजारात ह्युमनॉइड रोबोटचा पुरवठा करत आहेत. त्यांच्या नवीन क्लायंटला हा प्रकल्प मोठ्या प्रमाणावर सुरू करण्याची इच्छा आहे. कायदेशीर विलंब टाळण्यासाठी त्यांना नवीन रोबोट दिसण्यासाठी परवाना आवश्यक आहे. गर्दीच्या ठिकाणी हा रोबोट सल्लागार म्हणून काम करेल. रोबोटसाठी चेहरा देताना लिंग आणि वय काही फरक पडत नसल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे. यासाठी तुम्ही कंपनीच्या वेबसाइटवर दिलेला फॉर्म भरून अर्ज करू शकता.या नवीन चेहऱ्यासह, रोबोट २०२३ पासून क्रियाकलाप करण्यास सुरवात करेल,असे प्रोमोबोट कंपनीने सांगितले आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – काँग्रेसला बाजूला करुन कोणताही पर्याय देणार नाही – शरद पवार


 

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -