घरमनोरंजन'सेक्रेड गेम्स-२' समोर आहेत या अडचणी

‘सेक्रेड गेम्स-२’ समोर आहेत या अडचणी

Subscribe

'सेक्रेड गेम्स-२' बनवण्याचे काम सुरु करण्यात आले असले तरीही निर्मात्यांसमोर बऱ्याच अडचणी आहेत. सेक्रेड गेम्सचे बजेट २५ कोटी रुपयांचे असल्याचे सांगितले जात आहे. अडचणींमुळे नेटफ्लिक्स करणार मदत.

नेटफ्लिक्सची अनुराग कश्यप आणि विक्रमादित्य मोटवानी दिग्दर्शित वेबसीरिज ‘सेक्रेड गेम्स’ चांगलीच गाजली. सेक्रेज गेम्सचे संवाद, कलाकारांनी साकारलेल्या भूमिका आणि राजकीय पक्षावर केलेली टीका यामुळे ही वेबसीरिज चांगलीच गाजली. या वेबसीरिजचा पुढचा भाग लवकरच बघायला मिळणार म्हणून प्रेक्षक उत्साहित आहेत. मात्र सेक्रेड गेम्सचा पुढचा भाग सध्या अडचणीत असल्याचे चित्र आहे. चर्चेत असलेल्या सेक्रेड गेम्सचा पहिला भाग मुंबईतील गुंड, राजकारणी, जातीवाद आणि पोलीस यांच्यावर आधारित आहे. पहिली सीरिज ही आठ भागात आली होती. यामध्ये प्रत्येक भागात एक नवीन संदेश देण्यात आला होता. हे भाग एकमेकांशी निगडीत होते. वेबसीरिज प्रदर्शीत  झाल्यावर अनेकांनी त्यावर टीका केली तर काहींनी त्याचे कौतुक केले होते. पहिल्या वेबसीरिजमध्ये अर्धी गोष्ट सांगण्यात आली होती आता लवकरच याचा दुसरा भाग काढण्यात येईल अशी घोषणा निर्मात्यांकडून करण्यात आली होती. इन्स्टाग्रामवर याचा एक प्रोमोही बनवण्यात आला होता. या प्रोमोमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली होती. मात्र ‘सेक्रेड गेम्स-२’ समोर आता अनेक अडचणी उभ्या राहिल्या आहेत.

काय आहेत अडचणी

#metoo मोहीमेअंतर्गत दिग्दर्शक विकस बहल याच्यावर लैंगिक छळाचे आरोप लागले होते. याच बरोबर फँटम फिल्म ही कंपनीही बंद करण्यात आली. या कंपनीत दिग्दर्शक अनुराग कश्यप, विक्रमादित्या मोटवानी आणि प्रोड्यूसर मधु मंटोनाही सामील होते. सेक्रेड गेम्सचा दुसरा भागाची अधिकृत घोषणा करण्यात आली. दुसऱ्या सीरिजची स्टार कास्ट सुद्धा ठरवण्यात आली आहे. दुसरी सीरिजचे देखील आठ भागा विभागली गेली आहे. या सीरिजसाठी २५ कोटी रुपये अलॉर्ट करण्यात आले आहेत. मात्र आरोपांमुळे आणि कंपनीबंद पडल्यामुळे आता या सिजनला नेटफ्लिक्स स्वतः पूर्ण करणार असल्याची चर्चा आहे. ही सीरिज कोणत्या बँनरअंतर्गत बनणार आहे यावर अजूनही प्रश्नचिन्ह आहे.

- Advertisement -

सेक्रड गेम्स-२ मध्ये काय आहे विशेष

या सीजनमध्ये नवाजुद्दीन हा गणेश गायतोंडेच्या भूमिकेत दिसणार आहे. जतिन सराना हा बंटीच्या भूमिकेत दिसेल. सीरिज-२ मध्ये गणेश गायतोंडे तुरुंगातून सुटतो या पासून सीरिज सुरु होईल. गणेश गायतोंडे परदेशात जातो तर बंटी भारतात थांबतो. सेक्रेडच्या कथेत बदल करण्यात आले आहेत. यामध्ये काही नवीन कॅरेक्टरही प्रेक्षकांना दिसणार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -