घरदेश-विदेशआज काश्मीर बंदची हाक

आज काश्मीर बंदची हाक

Subscribe

७ नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या निषेधार्थ आज जम्मू बंदची हाक देण्यात आली आहे. बंदमुळे काश्मीरमधील शाळा, कॉलेज बंद असणार आहेत.

फुटीरतावाद्यांनी आज काश्मीर बंदची हाक दिली आहे. दहशतवाद्यांनी आणलेल्या स्फोटामध्ये ७ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला. त्याच्या निषेधार्थ आज काश्मीर बंदची हाक देण्यात आली आहे. या बॉम्बस्फोटामध्ये जवळपास ४० नागरिक जखमी झाले आहेत. दरम्यान, यासाठी सुरक्षा दलांना जबाबदार धरलं जात आहे. बंदमुळे काश्मीरमधील शाळा, कॉलेज बंद असणार आहेत. दरम्यान, आजच्या परिक्षा देखील रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच रेल्वे सेवा देखील बंद ठेवण्यात आली आहे. रविवारी झालेल्या कारवाईमध्ये ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला होता. यावेळी ३ जवान देखील शहिद झाले तर एक जवान गंभीर जखमी झाला. यावेळी झालेल्या स्फोटामध्ये ७ नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले. तर ४० जण जखमी झाले. त्यामुळे फुटिरतावाद्यांनी सुरक्षा दलांना दोषी धरत बंदची हाक दिली आहे.

वाचा – जम्मू – काश्मीरमध्ये ३ जवान शहीद

नेमकं झालं काय?

लाईन ऑफ कंट्रोल जवळील राजौरी भागात घुसखोरी होत असल्याची माहिती लष्कराला मिळाली. त्यानंतर लष्करानं सीआरपीएफच्या मदतीनं कारवाई सुरू केली. यावेळी ३ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. कारवाई दरम्यान नागरिकांनी घरं खाली करण्याचे आदेश लष्करानं दिले. पण, नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. शिवाय कारवाई दरम्यान नागरिकांनी घरामध्ये राहणे पसंत केले. त्यानंतर नागरिकांनी दहशतवाद्यांनी आणलेल्या स्फोटकांना स्पर्श केला. लष्करानं त्या वस्तुंना स्पर्श करून नका असे आवाहन केले. पण, नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर झालेल्या स्फोटात ७ नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान, मागील आठवड्याभरात १० दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे.

- Advertisement -

घुसखोरी वाढली

मागील काही दिवसांपासून पाक पुरस्कृत दहशतवाद वाढला आहे. शिवाय पाक लष्कराकडून देखील भारतीय चौक्यांना लक्ष्य केले जात आहे. या साऱ्याला भारतीय लष्कराकडून देखील चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. वाढता दहशतवाद पाहता चोख प्रत्युत्तर देण्याचे आदेश देखील सरकारनं लष्कराला दिले आहेत. त्यामुळे जवान देखील शोधून- शोधून दहशतवाद्यांचा खात्मा करत आहेत.

वाचा – कुलगाममध्ये ३ दहशतवाद्यांचा खात्मा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -