घरक्राइमVinod Kambli : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची ऑनलाईन फसवणूक ; तब्बल...

Vinod Kambli : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीची ऑनलाईन फसवणूक ; तब्बल १ लाखांचा गंडा

Subscribe

हल्ली ऑनलाईन फसवणूकीच्या जाळ्यात सामान्यांपासून ते अगदी असामान्यांपर्यंत सर्वांचीच फसवणूक झाल्याचे आतापर्यत उघडकीस आले आहे.त्यातच आता भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याची ऑनलाईन फसवणूक झाल्याचे वृत्त समोर आले आहे.एका ऑनलाईन भामट्याने विनोद कांबळी याची तब्बल १ लाखांची फसवणूक केली आहे.वांद्रे पोलिस ठाण्यात क्रिकेटपटूने या अज्ञाक सायबर गुन्हेगाराबाबत एफआयआर दाखल केली आहे. केवायसी अपडेट करायचे सांगत १ लाख १४ हजार रुपयांची फसवणूक केली आहे. हे प्रकरण ३ डिसेंबर रोजी झाले असल्याची महिती येत आहे.त्या सायबर गुन्हेगाराने बॅंकेचा कर्मचारी असल्याचे सांगितले असून, केवायसी माहिती अपडेट करण्यासाठी त्याने कांबळीकडे बँकेचे तपशील मागितले. बॅंकेचा तपशील मिळताच त्याने खात्यातून एक लाखापेक्षा जास्ता रक्कम लंपास केली.

वांद्रे पोलिसांना तक्रार मिळताच सायबर पोलिसांनी बॅंकेच्या मदतीने लंपास झालेली रक्कम परत मिळवून दिली.मात्र त्या सायबर गुन्हेगाराचा तपास पोलीस करत आहेत.विनोद कांबळी म्हणाले की, “फोनवर अलर्ट मिळाल्यानंतर मी लगेच बँकेच्या कस्टमर केअर नंबरवर फोन केला आणि खाते ब्लॉक केले. त्यानंतर मी पोलिसात जाऊन एफआयआर दाखल केली. असे म्हणत त्याने पोलिसांचे आभार मानले आहे.

- Advertisement -

हे ही वाचा – Big Bash League : आंद्रे रसेल प्रत्येक खेळाडूपासून २ मीटर राहणार दूर; खास ड्रेसिंग रूमचीही व्यवस्था


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -