घरमहाराष्ट्रवक्फ बोर्डाची हजारो एकर जमीन कुणी लाटली?; इम्तियाज जलिल यांचा सवाल

वक्फ बोर्डाची हजारो एकर जमीन कुणी लाटली?; इम्तियाज जलिल यांचा सवाल

Subscribe

ऑल इंडिया मुस्लीम इत्तेहादूल मुसलमीन (AIMIM) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी चांदिवलीत पार पडलेल्या जाहीर सभेत मुस्लिम आरक्षण वक्फ बोर्डाच्या जमीनीवरुन सर्वपक्षांवर आणि नेत्यांवर टीकास्त्र डागलं. तसंच, वक्फ बोर्डाची हजारो एकर जमीन कुणी लाटली? असा सवाल त्यांनी केला. मुस्लिम समाजातील अनेक बांधवांची हक्काची असलेली वक्फ बोर्डाची हजारो कोटींची जमीन कुठे गेली? 9 जणांवर गुन्हे आता दाखल केले आहे. पैशांच्या जोरावर जमिनी हडपल्या. त्याच्या विरोधात गुन्हे नोंदवले आहेत, असं जलील यांनी सांगितलं.

ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनचे अध्यक्ष ॲड. असदुद्दीन ओवैसी यांनी केला. ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) पक्षाच्या वतीने शनिवारी मुंबईतील चांदिवली येथे मुस्लिम आरक्षणाच्या मागणीसाठी आणि वक्फ बोर्डाच्या जमीन यासंदर्भात जाहीर सभा आयोजित केली होती. यावेळी बोलताना जलील यांनी थेट आणि परखड सवाल केले. आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. हे लोक मते मागण्यासाठी आपल्या दारात येतील. त्यांना विचारा मुस्लिम वक्फ बोर्डाच्या जमीनी कोणी लाटल्या? कुठे आहे वक्फ बोर्डाची ९३ हजार एकर जमीन? या जमिनी लाटणाऱ्यांवर मागील आठ महिन्यात नऊ एफआय आर दाखल केले आहेत, असं जलील यांनी सांगितलं. सरकारने या जमिनी दिल्यास अल्पसंख्यांकांना दरवर्षी दिला जाणारा ३००-४०० कोटी रुपयांचा निधी देऊ नये. उलट त्या जमिनी दिल्या तर आम्ही हा ३००-४०० कोटींचा निधी ‘खैरात’ म्हणून आम्ही सरकारला देऊ. त्या जमिनी आपला हक्का आहे, असंही जलील यांनी सांगितलं.

- Advertisement -

निवडणुका आल्यावर ज्याला जिकडं जायचं त्याने तिकडं जावं, पण त्याआधी आपल्या सर्वांना एकदा मुस्लीम म्हणून रस्त्यावर उतरण्याची गरज आहे. लोक म्हणतील काय होईल ५ टक्के आरक्षणाने, पण काय नाही होणार, सर्व होईल, असं जलील म्हणाले.


हेही वाचा – धर्मनिरपेक्षतेतून मुस्लिमांना काय मिळालं?, आरक्षण मिळालं का?, ओवैसींचा सवाल

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -