घरमुंबईMumbai Mahotsav : मुंबईत सहा दिवस रंगणार ‘मुंबै महोत्सवा’ची धूम; दिग्गजांचा होणार...

Mumbai Mahotsav : मुंबईत सहा दिवस रंगणार ‘मुंबै महोत्सवा’ची धूम; दिग्गजांचा होणार सन्मान

Subscribe

जीवनाधार फाऊंडेशनचा ‘मुंबै महोत्सव’ नामवंतांच्या उपस्थितीत रंगणार

मुंबईत वर्षभर जे पुरस्कार सोहळे होतात मात्र ‘मुंबै महोत्सवा’ची मुंबईकरांना मोठी उत्सुकता असते. यंदा मुंबईत सहा दिवस या महोत्सवाची धूम पाहायला मिळणार आहे. जीवनाधार फाऊंडेशनच्यावतीने आयोजित केल्या जाणाऱ्या ‘मुंबै महोत्सवा’त कला, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक अशा अनेक क्षेत्रातील मान्यवरांच्या कार्याचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. यंदा तब्बल ४१ मान्यवरांचा पुरस्कार देऊन सन्मान केला जाणार आहे.

यंदा मुंबै भूषण 2022 अॅड. उज्ज्वल निकम तर जीवनाधार जीवनगौरव 2022 निर्माते किरण शांताराम यांना प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय मुंबै गौरव पुरस्काराने गायिका सुलोचना चव्हाण, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, अभिनेते प्रशांत दामले, संगीतकार अशोक पत्की, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, नगरसेवक आशिष चेंबूरकर, खासदार गजानन कीर्तीकर, आमदार संजय पोतनीस यांच्यासह पुरस्कार नामावलीत विवेक देशपांडे, प्रसाद महाडकर, संकेत सावंत, कमलेश सुतार, आत्माराम परब, प्रभाकर वराडकर, डॉ. सुरेश नायर, कृष्णकांत ठाकूर, कुहू भोसले, संजय सावंत, मंगेशदा, आरती अतीन कांबळे, शहानवाज शेख, नागेश मोरवेकर, जिजाबा पवार, डॉ. रमेश भारमल यांना सन्मानित करण्यात येणार आहे.

- Advertisement -

मूर्तीकार विजय खातू यांना मरणोत्तर तर सामाजिक कार्य करणाऱ्या मित्रकुल या स्वयंसेवी संस्थेची निवड करण्यात आलेली आहे. कोरोनाचा प्रभाव आजही जगभर आहे. मुंबईत यासाठी ज्या डॉक्टरांनी ,कार्यकर्त्यांनी अहोरात्र मेहनत घेतली त्या कोवीड योद्ध्यांचासुद्धा सन्मान केला जाणार आहे.

यंदा १ ते ३ जानेवारी या दरम्यान बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे विलेपार्लेतील दीनानाथ नाट्यगृह, परेलमधील दामोदर नाट्यगृह हा महोत्सव रंगेल तर ४ ते ६ जानेवारीला फक्त निमंत्रितांसाठी वर्सोवा येथे हा महोत्सव होणार आहे. एकूण सहा दिवस हा महोत्सव असणार आहे. शासनाच्या नियमांचे पालन करुन संध्याकाळी ६ ते १० यावेळेत सर्वत्र हा महोत्सव होणार आहे.


नाशिक, धुळे, नंदूरबारमध्ये आयकर विभागाची छापेमारी; २४० कोटींची बेहिशोबी मालमत्ता हस्तगत


sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -