घरक्राइमनाशिक, धुळे, नंदूरबारमध्ये आयकर विभागाची छापेमारी; २४० कोटींची बेहिशोबी मालमत्ता हस्तगत

नाशिक, धुळे, नंदूरबारमध्ये आयकर विभागाची छापेमारी; २४० कोटींची बेहिशोबी मालमत्ता हस्तगत

Subscribe

आयकर विभागाच्या सुमारे दीडशेहून अधिक अधिकाऱ्यांच्या पथकाने नंदुरबार, धुळे आणि नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक, व्यापारी, उद्योजक, सरकारी कंत्राट घेणाऱ्या ठेकेदारांची निवासस्थाने, कार्यालय अशा जवळपास ३२ ठिकाणांवर एकाचवेळी छापेमारी केली आहे. या छापेमारीत आत्तापर्यंत सुमारे ६ कोटींची रोकड, पाच कोटीचे १० ते १२ किलो मौल्यावान सोन्याचे दागिने, हिरे, मोती जप्त केले आहेत. जवळपास पाच दिवस सुरु असलेल्या या कारवाईत २४० कोटींची बेहिशेबी मालमत्ता जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईमुळे उत्तर महाराष्ट्रातील सरकारी कंत्राट घेणाऱ्या ठेकादारांसह, जमीन व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.

नाशिक आयकर विभागाच्या अन्वेषण विभागास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, २२ डिसेंबरला पहाटेपासून नंदुरबार शहरातील जवळपास २० ते २२ कारचा ताफा वेगवेगळ्या भागात अचानक दाखल झाला. यावेळी मोठमोठ्या बिल्डर्स, सरकारी कंत्राट घेणाऱ्या ठेकेदारांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली. या छापेमारीदरम्यान मोठी सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. नंदुरबारमधील बडे डेव्हलपर्स, कन्स्ट्रक्शन कंपनीच्या मालकांसह भागीदार असणाऱ्या ६ ते ८ व्यापऱ्यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवरही आयकर विभागाने धाड टाकली, याचवेळी बिल्डर्स व ठेकेदारांच्या कुटुंबाशी संबंधीत व्यावसायिक भागीदार असणाऱ्या नाशिक, धुळेमधील व्यापारांच्या निवासस्थानाची कार्यालयांची आयकर विभागाने एकाच वेळी धाड टाकत कसून तपासणी सुरु केली.

- Advertisement -

नाशिकमध्ये तीन ठिकाणी छापेमारी

नाशिकमधील शहरातील तीन वेगवेगळ्या ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली, यात कॉलेज रोडवरील डिझुजा कॉलनीत आयकर विभागाने प्रथम छापा टाकला. या कॉलनीतील व्यावसायिकांच्या निवासस्थानी आणि कार्यालयाची झडती घेण्यात आली. देवळाली कॅम्प आणि भगूर येथील कार्यालयातही झडती घेण्यात आली, यावेळी कित्येकांच्या घरातून पैसाचं मोठं घबाड हाती लागल. यावेळी संबधीत व्यावसायिकाच्या नातेवाईकांचीही चौकशी करण्यात आली.

मौल्यावान हिऱ्यांसह , सोन्याची बिस्कीट जप्त

आयकर विभागाने केलेल्या छापेमारीत पाच कोटींच्या दागिन्यांत सोन्याची बिस्कीटे, हिरे, मौल्यवान मोत्याच्या दागिन्यांचा समावेश आहे. यात अनेक व्यावसायिकांनी बऱ्याच ठिकाणी दुसऱ्यांच्या नावावर व्यवहार केल्याचे आढळले. तर अनेकांना आपल्या नातेवाईकांच्या घरात पैसा लपवून ठेवला होता. बहुतेकांनी तर दुसऱ्यांच्या नावावर खरेदी-विक्रीचे व्यवहार मोठी गंगाजळी प्राप्त केली होती. या कारवाईमुळे आता उत्तर महाराष्ट्रात अनधिकृत मार्गाने अफाट पैसा कमावणाऱ्या बिल्डर आणि व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहे.

- Advertisement -

१२ तास सुरु होती पैसांची मोजणी

आयकर विभागाच्या तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अनेक व्यावसायिकांनी तब्बल २५ कोटींचे व्यवहार हे रोखीत केले होते. यावेळी तब्बल ६ कोटींची रोकड आणि ५ कोटींचे मौल्यवान दागिने सापडले. या अफाट पैशांची मोजणी करण्यासाठी आयकर विभागाच्या पथकाला जवळपास १२ तास लागले. पैसे मोजता मोजता मशीन थकल्या तर मोजणाऱ्यांचे हात दुखू लागले अशी स्थिती होती. पाच कापडी पिशव्यांमध्ये नोटांचे बंडल भरण्यात आले होते.

१७५ अधिकाऱ्यांसह २२ गाड्यांचा ताफा नंदूरबारला झाला रवाना

नागपूर, पुणे, नाशिक, ठाणे, कल्याण विभागातील आयकार विभागाच्या जवळपास १७५ अधिकाऱ्यांसह २२ गाड्यांचा ताफा एकाचवेळी वेगवेगळ्या मार्गाने नंदूरबारला पोहचले. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. अधिकाऱ्यांची वेगवेगळी पथके तयार केली. काही जणांनी गुजरातमधून धुळेमार्गे तर काही जण नवापूरहून नंदुरबारमध्ये पोहचले. दुसरीकडे नाशिक, धुळ्यात अशा वेगवेगळ्या मार्गाहून हा ताफा पोहचला. एकाच वेळी ही कारवाई झाल्याने संशयितांना रोकड व दागिने लपवता आले येणे शक्य झाले नाही. तसेच व्यावसायिकांच्या सीए, अकाउंटटला देखील उत्तरं देता आली नाही.


कोट्यवधींचा अत्तर व्यावसायिक पीयूष जैनला अटक, छापेमारीत २५७ कोटींची रोकड आणि दागिने जप्त

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -